शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गांधीवादी विचारसरणी आत्मसात करणे गरजेचे : कलानंद मणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 15:57 IST

अशांती दूर करण्यासाठी जात विरहीत समाजपद्धती, शांतीमय समाज, सर्वधर्म सलोखा ही गांधीवादी विचारसरणी आत्मसात करणे गरजेचे आहे. सध्याच्या नव्या जगाला दिशा देण्याचे सामर्थ्य गांधीजींच्या विचारसरणीमध्ये आहे, असे मत गोवा येथील ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत कलानंद मणी यांनी कणकवली येथे व्यक्त केले.

कणकवली , दि. ३ : अनेक गावे लुप्त होऊन त्यांचे शहरात रुपांतर होत आहे. एका बाजूने वैभव सामावले आहे, तर दुसºया बाजूने संघर्ष, अशांती आहे. ही अशांती दूर करण्यासाठी जात विरहीत समाजपद्धती, शांतीमय समाज, सर्वधर्म सलोखा ही गांधीवादी विचारसरणी आत्मसात करणे गरजेचे आहे. सध्याच्या नव्या जगाला दिशा देण्याचे सामर्थ्य गांधीजींच्या विचारसरणीमध्ये आहे, असे मत गोवा येथील ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत कलानंद मणी यांनी येथे व्यक्त केले.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कलानंद मणी यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी ते साबरमती ‘बा-बापू’ ही निघालेली यात्रा सोमवारी गोपुरी आश्रम येथे आली. यावेळी कलानंद मणी बोलत होते.

यावेळी दिल्लीचे रमेश शर्मा, डॉ. जेकॉब, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, हरिहर वाटवे, लक्ष्मण गायकवाड, नरेश भाई आदी गांधीवादी विचारवंत कार्यकर्त्यांसमवेत गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, अर्पिता मुंबरकर, मुरादअली शेख व राष्ट्रसेवा दलाचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी रमेश शर्मा म्हणाले, सध्याची जीवनशैली ही भोगवादी जीवनशैली आहे. गांधीजींचे विचार युवावर्गाने समजून घेणे गरजेचे आहे. वर्तमान जग अशांती, संघर्ष यांच्या वणव्यात गुरफटले असताना गांधीजींचे विचार शांतता, सद्भाव, अहिंसा आणि परस्पर सहजीवनाचा संदेश देणारे आहेत. हे विचार म्हणजे भविष्यातील पिढीला वैचारिक स्पष्टतेचे अधिष्ठान आहे. तरूण पिढीने विकासाचे प्रकल्प राबविताना चिरस्थायी विचार करून राबवावेत. युवावर्गापर्यंत गांधीजींचे विचार पोहोचविण्याच्या हेतूने ‘बा-बापू’ ही यात्रा काढण्यात येत आहे. समाजातील सज्जन शक्ती सक्रिय होण्याच्या दृष्टीने आम्ही यात्रेतून प्रयत्न करत असल्याचे  त्यांनी सांगितले.

वैशाली पाटील म्हणाल्या, नैसर्गिक वातावरणाचा विचार समाजपातळीवर होत आहे. भविष्यात पर्यावरण वाचवायचे असेल तर गांधीवादी विचार आवश्यक आहेत. कोकणात मायनिंग, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, जागतिकीकरण, खासगीकरणाचे प्रश्न आहेत. याविषयी समाजपातळीवर अनेक लढे सुरू आहेत. या लढ्यांना हिंसक वळण न देता गांधीजींच्या विचाराने लढून त्यावर विजय प्राप्त करावा. सरकारच्या चुका गांधीमार्गाने सोडविण्याचा प्रयत्न करावा. 

गोपुरी आश्रमाच्या उपक्रमांमध्ये गांधीवादी विचारांचा स्पर्श आहे. राष्ट्रसेवा दलात युवक-युवतींचा सहभाग पाहता पुढील पिढीसाठी हीच या विचारांची आशा आहे. अनेक चळवळींसाठी गोपुरीसारख्या संस्था कार्यरत आहेत. हे समाजाच्या दृष्टीने हिताचे आहे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. जेकॉब म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाच्या जाळ्याखाली युवा पिढी भरकटत आहे. याचा चांगला वापर केल्यास समाज घडविण्यात उपयोग होईल. त्यामुळे गांधीवादी मंडळींनी गांधीजींचे विचार युवापिढीपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन त्यांनी केले.