शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

गंधर्व शास्त्रीय संगीत सभेत स्वरांची मुक्त उधळण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 14:07 IST

आशिये येथील श्री दत्तक्षेत्र येथे आयोजित ३६ व्या संगीत सभेत कोलकत्ता येथील कौस्तुव कांती गांगुली (पद्मश्री पं.अजय चक्रवर्ती यांचे शिष्य) यांनी स्वरांची मुक्त उधळण केली . त्यांच्या गायनात रसिक अगदी चिंब होऊन गेले.

ठळक मुद्देगंधर्व शास्त्रीय संगीत सभेत स्वरांची मुक्त उधळण !आशिये येथे कौस्तुव गांगुली यांचे गायन ; गंधर्व फाऊंडेशनचे आयोजन

सुधीर राणे

कणकवली : येथील गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्हयात अभिजात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रसार व प्रचार करण्यासाठी जानेवारी २०१७ पासून गंधर्व मासिक संगीत सभेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात येत आहे .त्याचाच एक भाग म्हणून आशिये येथील श्री दत्तक्षेत्र येथे आयोजित ३६ व्या संगीत सभेत कोलकत्ता येथील कौस्तुव कांती गांगुली (पद्मश्री पं.अजय चक्रवर्ती यांचे शिष्य) यांनी स्वरांची मुक्त उधळण केली . त्यांच्या गायनात रसिक अगदी चिंब होऊन गेले.कौस्तुव गांगुली यानी मैफिलिची सुरुवात कर्नाटक संगीतातील राग 'चारूकेशी'ने केली.विलंबित,मध्य व दृत तालातील सादरीकरणाने रसिक भारावून गेले. आलाप,ताना,अभ्यासपूर्ण मांडणी ,समेवर येण्याची हातोटी,पतियाळा व अन्य घराण्यांच्या गायकीचा मिलाफ अशा वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणाने श्रोते अगदी सुखावले .याच कार्यक्रमाच्या सुरुवातीला २०१९ युवा गंधर्व सन्मान डॉ. कौस्तुव गांगुली यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार साबाजी पोलाजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा सन्मान भालचंद्र खानोलकर यांच्या स्मरणार्थ दामोदर खानोलकर यांनी पुरस्कृत केला होता.प्रास्ताविक केल्यानंतर प्रसाद घाणेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीला कौस्तुव गांगुली यानी अत्यंत अभ्यासपूर्ण रितीने उत्तरे दिली. त्यांनी यावेळी घरातून मिळालेली प्रेरणा,गुरु सानिध्य,शैक्षणिक व सांगितिक समांतर अभ्यास,मनाची एकाग्रता,भूप , देसकार,पुरिया ,मारवा ,देस, तिलककामोद या सारखे जवळ असणारे राग ,त्यांच्यातील साम्य व फरक सुंदरपणे विशद करून रसिकांना एक अनोखी मेजवानी दिली.त्यांचे वडिलही यावेळी उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी गंधर्व सभा उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कौस्तुव गांगुली यांनी मैफिलिची सांगता ठुमरी व भजन स्वरुपातील 'दया भवानी'या सुप्रसिद्ध भैरवीने केली.त्याना तबलासाथ रामकृष्ण उर्फ प्रसाद करंबेळकर (पं.रामदास पळसुले यांचे शिष्य)व हार्मोनियम साथ हर्षल काटदरे, चिपळूण(पं.विश्वनाथ कान्हेरे यांचे शिष्य) व तानपुरा साथ प्रियंका मुसळे यानी उत्कृष्टरित्या केली.दामोदर खानोलकर यांनी मान्यवरांचे व कलाकारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. ही गँधर्व सभा यशस्वी होण्यासाठीयळ शाम सावंत, अभय खडपकर,मनोज मेस्त्री,संतोष सुतार,किशोर सोगम,दामोदर खानोलकर,विलास खानोलकर,सागर महाडिक,विजय घाटे,अनंत बडे,संदीप पेंडूरकर,मयूर कुलकर्णी, करंबेळकर कुटुंबीय,प्रसाद कुलकर्णी, गुरुवर्य बाळ नाडकर्णी , बापू डांबे, सुनील आजगावकर, संजय कात्रे आदींनी विशेष मेहनत घेतली.या सभेसाठी संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.३७ वी संगीत सभा २६ जानेवारी रोजी !आशिये येथे २६ जानेवारी रोजी ३७ वी गंधर्व संगीत सभा होणार आहे. कुडाळ येथिल संगीत अलंकार ईश्वरी तेजम (नुतन परब)यांचे गायन यावेळी होणार आहे. या संगीत सभेचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गंधर्व फाऊंडेशन वतीने करण्यात आले आहे! 

टॅग्स :musicसंगीतsindhudurgसिंधुदुर्ग