शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

गद्यात देवगड, पद्यात वेंगुर्ले संघ चमकले

By admin | Updated: November 10, 2014 23:54 IST

रंगसंगीत एकांकिका : कोकण विभागीय स्पर्धेचा निकाल जाहीर

कणकवली : येथील अक्षरसिंध कलामंच आणि थिएटर अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रंगसंगीत एकांकिका स्पर्धेच्या विभागीय स्पर्धेत समर्थ कलाविष्कार देवगडच्या ‘एंड आॅफ द बिगनिंग’ या एकांकिकेला गद्य विभागात तर अणसूर वेंगुर्ले येथील ‘संगीत भोमासूर वध’ या एकांकिकेला पद्य विभागात प्रथम क्रमांक मिळाला.येथील मराठा मंडळ सभागृहात दोन दिवस ही स्पर्धा चालली. स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग घेतला होता. गद्य विभागात कलांकूर मालवण संघाच्या ‘सायलेन्स स्क्रिम’ला द्वितीय तर आयडियल इंग्लिश स्कूल कणकवलीच्या ‘क्लोन’ला तृतीय क्रमांक मिळाला. पद्य विभागात रंगखांब कणकवली संघाच्या ‘संगीत कवडसा’ला द्वितीय तर स्वप्नवेध युवा प्रतिष्ठान ओरोसच्या ‘संगीत नाते संस्कृतीचे’ला तृतीय क्रमांक मिळाला.उत्कृष्ट अभिनेता म्हणून योगसिद्धार्थ पराडकर (लेखक-एंड आॅफ द बिगनिंग), उत्कृष्ट अभिनेत्री शुभदा पवार (मुक्ताई- सायलेंट स्क्रीम), उत्कृष्ट लेखक कुनाल जामसांडेकर, उत्कृष्ट दिग्दर्शन दुर्गेशा वरूणकर (क्लोन) यांना गौरविण्यात आले. बक्षिस वितरण प्रसंगी थिएटर अकॅडमीचे सागर अत्रे, सुनिल देव, दिग्दर्शक सुहास वरूणकर यांच्यासह अक्षरसिंंधुचे अध्यक्ष प्रा.हरिभाऊ भिसे, कार्याध्यक्ष संजय राणे, किशोर कदम, संजय मालंडकर, निलेश महेंद्रकर, ऋषिकेश कोरडे, राजेश कदम, आशिष नाईक, प्रमोद पाटेकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कणकवली येथील अक्षरसिंध कलामंच आणि थिएटर अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रंगसंगीत एकांकिका स्पर्धेतील विजेत्या संघासमवेत सुहास वरूणकर, प्रा.हरिभाऊ भिसे, कार्याध्यक्ष संजय राणे, किशोर कदम, संजय मालंडकर, निलेश महेंद्रकर, ऋषिंकेश कोरडे, राजेश कदम, आशिष नाईक, प्रमोद पाटेकर आदी उपस्थित होते.