शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भविष्यातील निवडणूका महाविकास आघाडीच्या माध्यमातून बैठकीत निर्णय, पक्षनिरीक्षकाची माहिती 

By अनंत खं.जाधव | Updated: October 16, 2022 19:32 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भविष्यातील निवडणूका महाविकास आघाडीच्या माध्यमातून असा बैठकीत निर्णय झाला आहे. 

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतेही यापुढे गटतट राहणार नाहीत.आजच्या बैठकीत जे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष अनुपस्थित आहेत. त्याच्याकडून निश्चित असा खुलासा मागवण्यात येईल यापुढच्या सर्व निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्यात येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस चे सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरिक्षक शेखर माने यांनी सांगितले.

सावंतवाडीत रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस ची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माने बोलत होते.यावेळी माजी मंत्री प्रविण भोसले,जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अर्चना घारे-परब,काका कुडाळकर,बाळ कनायळकर,रेवती राणे, प्रफुल्ल सुद्रिक,दर्शना बाबर देसाई,पुंडलिक दळवी भास्कर परब आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरीषदेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात उतरले पाहिजे. पक्षाची पदे मिळविण्यासाठी नाहीत तर ती पदे संघटना मजबूत करण्यासाठी वापरली पाहिजेत. जे पदाधिकारी कार्यरत नाहीत त्यांच्या पदाचा फेरविचार केला जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी सांगितले.

सावंतवाडी  विधानसभा निवडणूकीत सावंतवाडीत मतदार संघातून अर्चना घारे परब रिंगणात उतरणार आहेत. मात्र उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय सर्वस्वी पक्षाध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आहे. कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे परब म्हणून  काम करीत आहेत. 

पुढच्या निवडणूकीतही त्या नक्कीच दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त करीत प्रत्येक पदाधिकार्‍यांने निवडणुकीला सामोरे गेले पाहीजे. पक्षासाठी काम केले पाहीजे. यासाठी आमचे प्रयत्न आहेत. तशा सुचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. कोणी टाळाटाळ केल्यास त्याला पदावरुन दूर केले जाणार आहे.तसेच जे पदाधिकारी तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष बैठकीला अनुपस्थित आहेत.त्याच्याकडून जिल्हाध्यक्ष खुलासा मागवतील असे ही माने यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी