शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांसमोरच मुलगा समुद्रात बुडाला

By admin | Updated: May 14, 2017 22:45 IST

गुहागरातील घटना; मूळचा सांगली जिल्ह्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कगुहागर : गुहागरात पर्यटनासाठी आलेला १३ वर्षीय मुलगा समुद्रात पोहत असताना बुडाला. पुष्कराज राजाराम पाटील (मूळ गाव, बहे ता.वाळवा जि.सांगली, सध्या रा.कऱ्हाड जि.सातारा) असे या मुलाचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ८ वाजता घडली. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. कऱ्हाडमधून पाटील कुटुंबिय व त्यांचे नातेवाईक असे सात जण पर्यटनासाठी शनिवारी दुपारी एक वाजता गुहागरमध्ये दाखल झाले. यामध्ये राजाराम आत्माराम पाटील (४३), पत्नी राजमती राजाराम पाटील, मुलगा पुष्कराज पाटील, मुलगी ऋतुजा राजाराम पाटील तसेच साडू राजेंद्र तुकाराम पाटील, सुनिता तुकाराम पाटील व मुलगी स्वराली तुकाराम पाटील यांचा समावेश होता. बाजारपेठेतील योगेश्वरी हॉटेलमध्ये ते उतरले. सायंकाळी गुहागर बाजारपेठ व समुद्रावर त्यांनी फेरी मारली. सकाळी पुन्हा ७.३० वाजता समुद्रात पोहण्यासाठी गेले. हे सातजण समुद्रात डुंबण्याचा आनंद घेत होते. अचानकपणे आलेल्या एका मोठ्या लाटेमध्ये पुष्कराज पाण्यामध्ये खेचला गेला. राजाराम पाटील यांना आपला मुलगा बुडत असल्याचे लक्षात आले. त्यांनी पुष्कराजला हात देण्याचा प्रयत्नही केला. मात्र लाटेच्या तडाख्यात पुष्कराज एवढा खोल खेचला गेला आणि बुडाला.पाटील कुटुंबियातील सहाजण बाजूला असूनही त्यांच्या डोळयादेखत पुष्कराज बुडाला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बाजूला असलेले पर्यटक व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पुष्कराजचे वडील राजाराम पाटील हे आष्टा (सांगली) येथे प्राध्यापक आहेत तर आई राजमती ही पाटण येथे प्राध्यापिका आहे. गुहागरचे पोलिस उपनिरीक्षक दीपक कदम यांनी घटनास्थळी येऊन पाटील कुटुंबियांना धीर दिला. मुलगा बुडाल्याचे वृत्त समजताच नगरपंचायतीचे जीवरक्षक, अ‍ॅडव्हेंचर बोटींगच्या कर्मचाऱ्यांनी स्पीडबोटच्या सहाय्याने पाण्यामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत नातेवाईक, पोलिस व ग्रामस्थांनी शोधमोहीम चालू होती. यापूर्वीही पर्यटक बुडण्याच्या घटनागुहागर समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटना जवळपास वर्षभराच्या फरकाने घडतच आहेत. यापूर्वी २६ सप्टेंबर २०१५ रोजी दुपारच्या वेळेत जेटीच्या शेजारी चेंबुर (मुंबई) येथील बद्रुद्दीन युसूफ अल्ला शेख यांच्यासह त्यांचे दोन मुलगे व एक मुलगी तसेच चिपळूण येथील प्रा. चांदा यांच्या दोन मुली व भावाचा मुलगा असे एकाचवेळी सातजण बुडाले होते.