शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्ल्यातील काजू कारखानदाराची फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 16:58 IST

जिल्ह्याच्या आरटीओ विभागात कार्यरत असलेल्या एका एजंटकडे बनावट दस्तऐवज करीत चुकीच्या पद्धतीने गाडी रजिस्ट्रेशन करून मठ वेंगुर्ला येथील काजू कारखानदार रोहन बोवलेकर यांची फसवणूक करण्यात आली.

ठळक मुद्देवेंगुर्ल्यातील काजू कारखानदाराची फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखलआरटीओ एजंटकडून बनावट कागदपत्रे देऊन लुबाडणुकीचा प्रकार

वेंगुर्ला : जिल्ह्याच्या आरटीओ विभागात कार्यरत असलेल्या एका एजंटकडे बनावट दस्तऐवज करीत चुकीच्या पद्धतीने गाडी रजिस्ट्रेशन करून मठ वेंगुर्ला येथील काजू कारखानदार रोहन बोवलेकर यांची फसवणूक करण्यात आली.

हा प्रकार चार दिवसांपूर्वी उघड झाला. दरम्यान, या प्रकरणी बोवलेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडीतील आरटीओ एजंट साईनाथ म्हापसेकर याच्याविरोधात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याला सिंधुदुर्ग आरटीओ अधिकारी जे. एम. पाटील यांनी दुजोरा दिला आहे. तसेच हा प्रकार घडल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही संबंधित एजंटच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना बोवलेकर यांना दिल्या आहेत, असे सांगितले.याबाबत अधिक माहिती अशी की, मठ येथे राहणारे बोवलेकर हे काजू कारखानदार आहेत. त्यांनी पर्वरी-गोवा याठिकाणी ६ जानेवारी २०१८ रोजी कार खरेदी केली होती. त्यांनी ही कार रजिस्ट्रेशन करण्यासाठी साईनाथ म्हापसेकर यांच्याकडे दिली. तसेच व्हीआयपी नंबर हवा असल्यामुळे त्यांनी नंबरचे पैसे आणि उर्वरित फी दिली.१८ जानेवारी २०१८ रोजी खास रजिस्ट्रेशन नंबर मिळण्यासाठी साईनाथ याने ७ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर गाडी घेऊन ओरोस येथील कार्यालयात तपासणीसाठी बोलावले. त्या ठिकाणी गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी गाडीची तपासणी केली. तसेच चेस नंबर घेतला आणि गाडी घेऊन जा, असे सांगण्यात आले.महिन्यानंतर साईनाथने रजिस्ट्रेशन झालेले परवाना पत्र आणून दिले. आणून दिलेल्या दस्तऐवजांवरून गाडीचा इन्शुरन्स नूतनीकरण करण्याकरिता मारुती इन्युरन्स ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गोवा कार्यालयाकडे संपर्क केला. त्यावेळी ती गाडी अन्य व्यक्तीच्या नावे दिसली.

याबाबत साईनाथकडे चौकशी केली असता त्याने तुमच्या गाडीचा नंबर चुकून दुसऱ्या गाडीला दिलेला असल्याने मी तुम्हांला एमएच-०७-एजी ६९९९ हा नवीन नंबर रजिस्टर करून देतो असे सांगितले. परंतु ७ आॅगस्ट रोजी ११.३० वाजेपर्यंत परवाना पत्र आणून न दिल्याने बोवलेकर यांनी आरटीओ कार्यालय गाठले. तिथे ही गाडी अद्याप रजिस्ट्रेशन न झाल्याचे सांगण्यात आले.यावरून साईनाथ म्हापसेकर याने आपली फसवणूक केल्याप्रकरणी रोहन बोवलेकर यांनी त्याच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार ओरोस येथील पोलीस ठाण्यात म्हापसेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीsindhudurgसिंधुदुर्ग