शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार विद्यार्थी अप्रगत श्रेणीत

By admin | Updated: November 18, 2015 00:04 IST

शिक्षण समिती सभेत उघड : शिक्षणमंत्र्यांच्या ‘त्या’ धोरणाला कडाडून विरोध

सिंधुदुर्गनगरी : विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणी सर्वेक्षणातून तब्बल चार हजार विद्यार्थी हे अप्रगत श्रेणीत असल्याचे शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. या विद्यार्थ्यांना प्रगत श्रेणीत आणण्यासाठी शिक्षकांसमोर मोठे आव्हान आहे. आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करणे हा शासनाचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी मारक असल्यामुळे अप्रगत विद्यार्थ्यांमध्ये वाढ होत आहे, असा समिती सभेत आरोप करत आता दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे सूतोवाच करणाऱ्या शिक्षणमंत्र्यांच्या धोरणाला कडाडून विरोध करत तसा ठरावही घेण्यात आला.जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य प्रकाश कवठणकर, राजेंद्र म्हापसेकर, वैशाली रावराणे, सुकन्या नरसुले, संघटना प्रतिनिधी संजय बगळे, संतोष पाताडे, फादर लोबो, समिती सचिव तसेच शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या १४६८ शाळांमध्ये शासन आदेशान्वये विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीचे मूल्यांकन करण्यात आले होते. यातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांपैकी तब्बल ४ हजार विद्यार्थी हे अप्रगत आहेत. हे सर्व विद्यार्थी इयत्ता पहिली ते सातवी इयत्तेमधील आहेत. सातवी इयत्तेत असणारा विद्यार्थी अप्रगत म्हणून गणला गेला, तर तो विद्यार्थी प्रगत श्रेणीत आल्याशिवाय त्याला आठव्या इयत्तेत प्रवेश घेता येणार नाही.आठवीपर्यंत ना परीक्षा फक्त पास हे राज्य शासनाचे धोरण अप्रगत मुलांसाठी मारक ठरत आहे. आता तर शिक्षणमंत्र्यांनी दहावीपर्यंत परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पासकरण्याचे सूतोवाच केले असल्यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धीक पातळी खुंटणार आहे. या सर्व धोरणांना आमचा विरोध असूनदहावीपर्यंत परीक्षा घेऊनच विद्यार्थ्यांना पास अगर नापास ठरवावे, असा एकमुखी ठराव आजच्या शिक्षण समिती सभेत घेण्यात आला.सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांमध्ये जरी गुणवत्ता व बौद्धीक क्षमता चांगल्याप्रकारे असली तरी विद्यार्थी आत्मविश्वासाने बोलत नाही. त्यांना पाठ्यपुस्तकातील अभ्यासाव्यतिरिक्त इतर सर्वसामान्य माहितीचे ज्ञान असणे आवश्यक असल्याची खंत सदस्य प्रकाश कवठणकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)अनुदान ठप्प झाल्याने ई-लर्निंग शाळा बंदशिक्षण विभागाने गतवर्षी वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुर्ले व उभादांडा शाळा नं. १ या दोन शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा सुरू केली खरी. मात्र अनुदानाअभावी या दोन शाळांमधील ही सुविधा कोलमडली आहे. हा मुद्दा सदस्या सुकन्या नरसुले यांनी मांडला होता. यावर उत्तर देताना शिक्षणाधिकारी म्हणाले, सादीलमधून या शाळांचा खर्च भागवायचा आहे. मात्र शासनाकडून गेली दोन वर्षे सादीलची रक्कमच मिळाली नसल्याने हे अनुदान रखडले आहे.