शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणाचा शुभारंभ आॅक्टोबरमध्ये

By admin | Updated: July 23, 2016 23:47 IST

विनायक राऊत : महामार्गावरील धोकादायक खड्डे बुजविण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा शुभारंभ येत्या आॅक्टोबर महिन्यात करण्यात येणार असल्याची माहीती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच शनिवारी सायंकाळी कुडाळ शहरातून जाणाऱ्या महामार्गाची पाहणी करून कणकवली ते झाराप रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरील धोकादायक खड्डे तात्काळ बुजवा, असे आदेश त्यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.महामार्गावर पडलेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला असून कणकवली येथील तलाठी उत्तम पवार यांचा शुक्रवारी या खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीर दखल जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी घेतली असून शनिवारी सायंकाळी कुडाळ शहरातूप जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली.यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे कुडाळ तालुकाध्यक्ष राजन नाईक, सावंतवाडी तालुकाध्यक्ष रूपेश राऊळ, पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर, शेखर गावडे, महामार्ग विभागाचे उपअभियंता ए. टी. आवटे व अन्य अधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कुडाळ येथील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी यावेळी त्यांनी केली व रविवारी सकाळपासून कणकवली ते झाराप या महामार्गाची तात्काळ दुरूस्ती करावी असे आदेश दिले. खासदार राऊत या महामार्गाची पाहणी करीत असताना तेथून कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे जात होते त्यांनी त्याठिकाणी थांबून महामार्गावरील खड्ड्यांची स्थिती खासदारांना दाखविली. महामार्गाची स्थिती अत्यंत धोकादायक बनली असून उपाययोजना करणे गरजेचे आहे. रविवारी सकाळपासून कणकवली ते झाराप या महामार्गाची दुरूस्ती करावी व याठिकाणी सुरू असलेले काम पाहण्यासाठी आपण तेथे उपस्थित राहणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. जिल्ह्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोललो असून जिल्ह्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ येत्या आॅक्टोबर महिन्यात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)