शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांत चार लाख पर्यटकांची भेट

By admin | Updated: May 11, 2015 23:27 IST

महाबळेश्वर बहरले : वातावरणातील बदलाने जगभरातील पर्यटक सुखावले

महाबळेश्वर : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांचा मुख्य हंगाम सुरू झालाय. ऐन उन्हाळ्यात येथे झालेल्या वळवाच्या पावसाने ‘पर्यटक राजा’ चांगलाच सुखावला आहे. उन्हाळी हंगामात वातावरणात झालेल्या या बदलामुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरून गेले आहे. गेल्या दहा दिवसांत सुमारे चार लाख पर्यटकांनी या पर्यटनस्थळाला भेट दिली आहे.महाबळेश्वर हे पर्यटकांना नेहमीच खुणावत असते. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात; परंतु पर्यटकांचा मुख्य हंगाम हा एप्रिल आणि मे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या असून, महाबळेश्वर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. कडक उन्हाळ्यात महाबळेश्वरात पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. एप्रिल महिन्यात कितीतरी वेळा असे वातावरण पाहावयास मिळाले आहे. अशातच काही दिवसांपूर्वी झालेल्या वळवाच्या पावसामुळे वातावरणात बदल घडला आहे. काही हौशी पर्यटकांबरोबरच स्थानिक नागरिकांनीही या पावसाचा आनंद लुटला.पर्यटकांचा उन्हाळी हंगाम सुरू झाल्याने येथील हॉटेल व्यावसायिक तसेच मुख्य बाजारपेठ पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. महाबळेश्वरची खासियत असणाऱ्या स्ट्रॉबेरीपासून ते जाम, जेली, चिक्की, चने अशा एकापेक्षा एक वस्तूंनी बाजारपेठ बहरून गेली आहे. पर्यटक दिवसभर येथील विविध पॉइंटला भेट देत आहेत. तर सायंकाळी नौकाविहारासाठी पर्यटकांची वेण्णा तलाव येथे गर्दी होत आहे. महाबळेश्वरसह पाचगणीलाही पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत आहेत. (प्रतिनिधी)गुजराती पर्यटकांची संख्या अधिक एप्रिल आणि मे हे महाबळेश्वरवासीयांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे महिने. यावेळी येथे पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. महाबळेश्वरला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये गुजराती पर्यटकांची संख्या अधिक आहे. या व्यतिरिक्त, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब या राज्यांतूनही पर्यटक दाखल होत आहे.