शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणप्रकरणी चौघांना न्यायालयीन कोठडी

By admin | Updated: April 17, 2017 23:15 IST

अपहरणप्रकरणी चौघांना न्यायालयीन कोठडी

कणकवली : तालुक्यातील फोंडा-खैराटवाडी येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन लग्न लावण्याच्या तयारीत असलेल्या मालवण तालुक्यातील आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर याच्यासह तिघांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, कोठडीत जाताच गावकर याचा रक्तदाब वाढल्यामुळे त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजन गावकर, अमित गावकर, श्याम निकम या तिघांना सोमवारी सकाळी अटक करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी बबन निकम (रा. कोल्हापूर) याला रविवारी अटक झाली होती. त्याला सोमवारपर्यंत एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती. त्याला आता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. १४ एप्रिल) सकाळी ६ वाजता आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर याने आपल्या पांढऱ्या रंगाच्या गाडीतून या मुलीला पळविल्याचा आरोप या मुलीच्या नातेवाइकांनी केला होता. शनिवारी पोलिसांनी बबन निकम याला अटक केली होती. सोमवारी सकाळी या प्रकरणातील अन्य तीन आरोपी राजन जगन्नाथ गावकर (५३), अमित राजन गावकर (२४, रा. आचरा) व श्याम निकम (रा. मुणगे) यांना अटक करून कणकवली न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. फोंडा-खैराटवाडी येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन लग्न लावण्याच्या तयारीत असलेल्या बबन निकम, राजन गावकर, श्याम निकम व अमित गावकर यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. मात्र, या प्रकरणाची जुळवाजुळव करणारा आचरा येथील माजी सरपंच राजन गावकर व श्याम निकम यांना अटक करा, अशी मागणी महिला दक्षता समितीच्या स्नेहा तेंडुलकर, शमिता बिरमोळे यांनी पोलिसांकडे करत जाब विचारला होता.संशयितांना अटक न झाल्यामुळे कातकरी समाजाच्यावतीने आंदोलनाचा इशारा चित्रकार नामानंद मोडक व अंकुश कदम यांनी दिला होता. राजन गावकर याला अटक न केल्यास कातकरी समाजाच्यावतीने आंदोलनाची तयारी करण्यात आली होती. सर्व बाजूंनी दबाव वाढल्यामुळे अखेर पोलिसांना राजन गावकर याच्यासह अन्य तिन्ही आरोपींना अटक करणे भाग पडले. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत. (वार्ताहर)