शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्राचीन कोरीव शिल्प आढळले, बघ्यांनी केली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 11:14 IST

मालवण तालुक्यातील आचरा टेंबली येथे एका घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना चौकोनी आकाराच्या दगडावर कोरलेले रेखीव शिल्प सापडले आहे

आचरा : मालवण तालुक्यातील आचरा टेंबली येथे एका घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना चौकोनी आकाराच्या दगडावर कोरलेले रेखीव शिल्प सापडले आहे. हे शिल्प सापडल्याची चर्चा आचरा परिसरात सोशल मीडियावर रंगली होती. त्यानंतर ते पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली.आचरा टेंबली येथे एका घराच्या बांधकामासाठी जागेचे सपाटीकरण करताना खडकाळ भाग खोदून माती व दगड बाजूला टाकताना हे कोरीव शिल्प सापडले आहे. चौकोनी आकाराच्या  दगडावर दोन  स्त्रिया पिंडी घेऊन बसल्याचे चित्र कोरण्यात आले आहे. खोदलेली माती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला टाकताना मातीत ठेकेदाराला चौकोनी आकाराचा  दगड सापडला होता. सपाटीकरण  करताना काढलेली माती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला टाकली जात होती. त्यावेळी त्या मातीत चौकोनी आकाराचा दगड ठेकेदारास दिसून आला असता कुतूहलापोटी ठेकेदाराने तो दगड बाजूला काढून घेत मातीने भरलेला तो दगड साफ करण्यास सुरुवात केली असता त्यावर कोरीव काम केले असल्याचे आढळून आले. शिल्प  मिळाल्याची  बातमी आचरा  परिसरात सोशल मीडियावर पसरली होती. त्यामुळे शिल्प बघण्यासाठी लोक धाव घेत होते. 

सतीगळ असण्याची शक्यताहा एक वेगळ्या प्रकारचा सतीगळ (सती दगड) असण्याची शक्यता आहे. युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या वीराच्या स्मरणार्थ वीरगळ उभारण्याची प्रथा होती. तशीच प्रथा वीराची पत्नी सती गेल्यावर तिच्या स्मरणार्थ सतीगळ उभारण्याची होती. गळ हा शब्द कन्नडमधील कल्ल (दगड) या शब्दाचा अपभ्रंश होऊन आला आहे. सामान्यत:  सतीगळाच्या शिल्पामध्ये स्त्रीचा हात आशिर्वादाच्या स्थितीत कंकणादि सौभाग्य अलंकारांसह असतो. तथापि या शिल्पात तो दिसत नाही. मात्र दोन स्त्रिया शंकराची अर्चा करताना दिसत असून त्याचा अर्थ त्या शिवरुप होऊन कैलासवासी झाल्या आहेत व त्यांना मोक्ष मिळाला आहे, असा होतो. या ठिकाणी दोन स्त्रिया सती गेल्या असाव्यात. शिल्पाच्या वर कलश स्पष्ट दिसतो आहे. कलशाच्या डाव्या उजव्या बाजुला चंद्र-सुर्याच्या प्रतिमा असतात. परंतु या शिल्पात झीज झाल्यामुळे त्या दिसत नसाव्यात. शिल्पाचा दगड ‘सँडस्टोन’ प्रकारातील आहे, असे छायाचित्रावरुन दिसते. हा दगड कर्नाटकात मोठ्या प्रमाणात सापडतो. शिल्पाच्या कारागिरीवरुन ते उत्तर मध्ययुगीन (इ.स.चे १२ वे ते १५ वे शतक) किंवा त्याही अलीकडील असण्याची शक्यता आहे.सतीश लळीतशिल्प अभ्यासक, माहिती उपसंचालक, कोल्हापूर२६१२२०१७ - केएएनके - १०आचरा टेंबली येथे खोदकाम करताना चौकोनी आकाराच्या दगडावर कोरलेले रेखीव शिल्प सापडले आहे.