शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार जयानंद मठकर यांचे निधन

By admin | Updated: April 7, 2016 23:58 IST

आज अंत्यसंस्कार : बेळगावातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

सावंतवाडी : समाजवादी नेते, माजी आमदार, स्वातंत्र्य-सेनानी तथा ज्येष्ठ पत्रकार जयानंद शिवराम मठकर (वय ८७) यांचे गुरुवारी सकाळी बेळगाव येथील के.एल.ई. रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी सावंतवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.माजी आमदार जयानंद मठकर यांचा जन्म मुंबई येथे १२ आॅक्टोबर १९२९ साली झाला. त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी गोवा स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. ते नॅशनल काँग्रेस गोवा आणि गोवा विमोचन समितीचे सक्रिय कार्यकर्ते होते.मठकर यांनी समाजवादी पक्ष वाढीसाठी गावागावांत जाऊन प्रयत्न केले. समाजवादी पक्षाने त्यांना १९७४ साली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. यावेळी त्यांनी दिग्गज उमेदवारांना पराभूत करत विजय संपादन केला. या त्यांच्या विजयाने समाजवादी पक्षाला नवचैतन्य मिळाले होते. १९७८ सालीही मठकरच या मतदारसंघातून निवडून आले होते. सहा वर्षे मठकर यांनी सावंतवाडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. नंतरच्या निवडणुकीत जयानंद मठकर यांचा पराभव झाला तरी त्यांनी सामाजिक कार्याचा वसा सोडला नाही. पक्षाच्यावतीने होणारे मोर्चे, तसेच आंदोलने यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. अनेक वेळा त्यांना वेगवेगळ्या आंदोलनांसाठी कारावासही भोगावा लागला आहे. त्यांनी विधानसभेत सिंधुदुर्गच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. बांधकाम विभागाच्या रस्ता कामगार यांच्यासाठी अनेक आंदोलनेही केली होती. नेमळे येथील (पान १ वरून) कौल कारखाना तसेच श्रीराम वाचन मंदिर या संस्था त्यांच्यावरील असलेल्या विश्वासानेच चालत होत्या. दहा वर्षांपासून त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. त्यामुळे त्यांनी सक्रिय राजकारणापासून तसेच समाजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. सिंधुदुर्गच्या राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा शब्द प्रमाण मानला जात होता. माजी केंद्रीय रेल्वेमंत्री कै. मधु दंडवते यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. दंडवते सावंतवाडीत आल्यावर नेहमी मठकर यांच्याकडेच यायचे. मठकर यांना त्यांच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये आर्यभूषण पुरस्कार, राष्ट्रवादीचा राज्यस्तरीय ग्रंथालय सन्मान पुरस्कार, संपादक गौरव पुरस्कार, भाईसाहेब सावंत स्मृती पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे, तर २००१ मध्ये त्यांचा सावंतवाडीवासीयांच्या वतीने नागरी सत्कारही करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी रेल्वेमंत्री मधु दंडवते यांच्यासह माजी विधानसभा अध्यक्ष ग. प्र. प्रधान, मृणालताई गोरे, मधु मंगेश कर्णिक, शिवरामभाऊ जाधव उपस्थित होते.जयानंद मठकर यांनी सावंतवाडीत पार पडलेल्या विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तसेच स्वागत अध्यक्षपदही भूषविले होते.गेल्या महिन्याभरापासून त्यांना बेळगाव येथील के.एल.ई. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण त्यांची प्रकृती आणखीच खालवली. गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मठकर यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मठकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या उभाबाजार येथील निवासस्थानी सर्व क्षेत्रातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. (प्रतिनिधी)शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कारमाजी आमदार जयानंद मठकर यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी विविध पक्षाचे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, गोवा व महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.मधु दंडवतेंचे जीवन चरित्र अपुरे राहिल्याचे शल्यमाजी आमदार जयानंद मठकर यांचे मधु दंडवते यांच्याशी जवळचे नाते होते. त्यामुळे मठकर यांनी दंडवते यांचे जीवन चरित्र लिहिण्याचा संकल्प सोडला होता. मात्र, त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नसल्याने हे जीवन चरित्र लिहिणे राहिल्याचे त्यांनी अनेकजणांकडे बोलून दाखवले होते. हे शल्य त्यांना कायम राहिले होते.