शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पक्षभेद विसरून दुष्टप्रवृत्ती विरोधात एकत्रितपणे लढा द्या, सुधीर सावंत यांचे आवाहन

By सुधीर राणे | Updated: June 22, 2024 16:59 IST

कणकवली येथे श्रीधरराव नाईक यांचा ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम

कणकवली: मारामारी, खून हा राजकारणाचा विषय नाही. राजकारणात हे घडत असेल तर त्याला ठेचून काढले पाहिजे. श्रीधरराव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय नेते होते. त्यांची हत्या करणाऱ्या दुष्ट प्रवृत्ती विरोधात केवळ वैभव नाईक, सुशांत नाईक यांचा लढा नाही. तर तो आपल्या सर्वांचा आहे. त्यासाठी सर्वानी पक्षभेद विसरून एकत्रितपणे लढा द्या असे आवाहन माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केले. श्रीधरराव नाईक यांच्या ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त कणकवली येथे आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्धवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, नीलम सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, सुगंधा साटम, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, मुरलीधर नाईक, अरुण भोगले, संकेत नाईक आदी उपस्थित होते.वैभव नाईक म्हणाले, २२ जून हा दिवस आयुष्यात येऊच नये असे आम्हाला वाटते. श्रीधर नाईक यांचे कार्य युवापिढीला समजावे, युवा पिढीने त्यांचे विचार आत्मसात करून समाजकार्यात पुढे यावे. त्यासाठी हा स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित केला जातो. श्रीधर नाईक हे रंजल्या गांजलेल्यांना मदत करत होते. त्यांची लोकप्रियता वाढत चालली होती. त्यांचे हे यश पचत नसल्याने त्यांची हत्या करण्यात आली. ते चुकीच्या गोष्टीला कडाडून विरोध करत असत. त्यांचे कार्य पुढे घेऊन जाणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.संदेश पारकर म्हणाले, श्रीधर नाईक यांच्या स्मृति चिरंतन ठेवण्यासाठी त्यांचा वारसा जोपासण्यासाठी वैभव नाईक, सुशांत नाईक, संकेत नाईक हे मेहनत घेत आहेत. जिल्ह्याच्या जडणघडणीत नाईक कुटूंबांचे मोठे योगदान आहे. राजकारणातील अडथळा दूर करण्यासाठी श्रीधर नाईक यांची हत्या करण्यात आली.  सध्या राजकारणात सत्तेसाठी पैसे आणि पैशासाठी सत्ता हेच समीकरण चालू आहे. न्याय, मते आणि नेते देखील पैशाने विकत घेतले जात आहेत. जनतेने अशा प्रवृत्ती विरोधात लढले पाहिजे. अमित सामंत, इर्शाद शेख ,विवेक ताम्हणकर, संदीप सरवणकर, नीलम सावंत आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. बाळू मेस्त्री यांनी सूत्रसंचालन केले. तर संकेत नाईक यांनी आभार मानले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारण