शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election: आचारसंहितेचे काटेकोर पालन करा, कणकवलीच्या तहसीलदारांनी केल्या सूचना

By सुधीर राणे | Updated: November 15, 2022 14:23 IST

कोणत्याही विकास कामांची भूमिपूजन करता येणार नाहीत

कणकवली : कणकवली तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे या निवडणुका शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी राजकीय पक्षांनी घ्यावी. अशा सूचना कणकवलीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी रमेश पवार यांनी दिल्या.           कणकवली तालुका ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता आढावा बैठक तहसीलदार दालनात आज, मंगळवारी पार पडली यावेळी निवासी नायब तहसीलदार शिवाजी राठोड, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, निवडणूक सहायक मयुरी चोपडे आदी उपस्थित होते.             यावेळी बैठकीस उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आचारसंहिता लागू असताना जलजीवन मिशन अंतर्गत विकास कामांची भूमिपूजने करता येतील का? अशी विचारणा केली. त्यावर कोणत्याही विकास कामांची भूमिपूजन करता येणार नसल्याचे तहसीलदार पवार यांनी स्पष्ट केले. तंटामुक्त समिती बैठक निवडणूक कालावधीत होऊ नये. तसे पत्र संबंधित लोकांना देण्यात यावे. अशी मागणी सचिन सावंत यांनी केली. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदारांनी दिले.निवडणूक नोटीस १८ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली आहे. १८ ते २३ डिसेंबर निवडणूक आचारसंहीता कालावधी आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याची व्यवस्था आहे. ५८ ग्रामपंचायतीसाठी १८८ ठिकाणी मतदान केंद्र आहेत. ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार पवार यांनी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक