शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा

By admin | Updated: September 20, 2015 00:13 IST

विनोद तावडे : सिंधुदुर्गनगरीत शिक्षणमंत्र्यांनी घेतला आढावा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात शासनाच्या सर्व विभागांत रिक्त पदांमुळे शासकीय योजना राबविताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शासनाकडे विशेष बाब म्हणून कोकणातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. सिंधुदुर्गनगरी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली यांसह सर्व विभागांचे विभागप्रमुख बैठकीला उपस्थित होते. विनोद तावडे म्हणाले, प्रत्येक विभागाने आपल्या विभागात मंजूर पदे व रिक्त पदांची माहिती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सादर करावी. तसेच जिल्ह्यात ज्या विभागांचे शासनाकडे मंत्रालय स्तरावर मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविले आहेत व अद्यापपर्यंत ते मंजूर झाले नाहीत असे प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित राहू नयेत यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रत्येक विभागाने अशा प्रलंबित प्रस्तावांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्याचे आदेश तावडे यांनी दिले. (प्रतिनिधी) यंत्रणा प्रभावीपणे राबवा सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावावीत. आरोग्य विभागाने साथींच्या कालावधीत अतिरिक्त डॉक्टरांची सेवा मागणी करावी, जेणेकरून जिल्ह्यातील जनतेचे आरोग्याचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे मंत्री विनोद तावडे म्हणाले. स्वाइन फ्लू अथवा लेप्टोस्पायरोसिस या आजारांचा प्रादुर्भाव असणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, तसेच प्रभावीपणे यंत्रणा राबविण्याचे आदेशही दिले. नुकसानभरपाई वस्तुस्थितीदर्शक असावी नुकसानभरपाई रकमेचे वाटप शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विहीत कालावधीत करण्यात यावे; वन विभागाने वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना देण्यात येणारेनुकसानभरपाईचे प्रस्ताव वस्तुस्थितीला धरून सादर करावेत, अशा सूचना तावडे यांनी दिल्या.