शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बागायतदारांकडून निर्वाणीच्या उपायांवर भर

By admin | Updated: July 10, 2014 00:11 IST

तुुडतुड्यांच्या हल्ल्याने हतबलता : पावसाच्या ओढीची प्रतीक्षा

नरेंद्र बोडस - देवगडनिसर्गचक्रच बदलल्यामुळे कधी नव्हे एवढी बागायतदारांची हतबलता पुढे आली आहे. तुडतुड्याच्या प्रचंड हल्ल्यामुळे काही प्रमाणात फवारण्या केल्याशिवाय हा हल्ला परतवून लावणे अशक्य होणार आहे. परंतु फवारणीपूर्वी व नंतर किमान एक ते दोन दिवस पावसाने ओढ दिल्याशिवाय फवारणीचा परिणाम होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली असल्याने अशाप्रकारची संधी बागायतदारांना मिळण्याची शक्यता कमी आहे. म्हणूनच कोवळी पालवी त्यांच्या भक्ष्यस्थानी पडून झाडे पुन्हा पालवण्याची प्रक्रिया कालांतराने सुरु होईल व म्हणूनच आंबा हंगाम पुढे जाईल अशी भीती बागायतदारांना वाटत आहे. पावसाने जोर धरला तरी किटकनाशक फवारणी न करता संजीवके वापरण्याचा कालावधी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्याअखेर लांबवता येत नाही. पालवी नष्ट झाल्याने संजीवकाचा तसाच वापर करणे किंवा पावसाअभावी खतांचा डोस यापूर्वी न देता आल्याने तो आता देऊन मग संजीवकाचा डोस लांबवणेही आंबा बागायतदारांना स्वतंत्रपणे वेळापत्रक आखून करता येणे शक्य होत नाही. किटकनाशक फवारणीसाठी काळ अनुकूल असल्यास सायपर मेश्रीन, इमिडा यांची फवारणी आंबा कलमांवर करावी लागेल. त्याबरोबर डी डी इ पी (डायक्लोरोव्हास)ची फवारणीही करणे उपयुक्त ठरेल, असे जाणकार आंबा बागायतदार सुनिल कुलकर्णी यांचे हे मत आहे.देवगड तालुक्यात सध्या कुणकेश्वर, मिठमुंबरी, तारामुंबरी आदी भागात पालवीची फूट अद्याप पुरेशी नाही तर विजयदुर्ग पट्ट्यात कलमे उत्तमप्रकारे पालवल्याचे चित्र आहे. याठिकाणी नवीन पालवीची जपणूक होणे गरजेचे आहे. फवारणी करणे जरुरीचे ठरत असल्याने आंबा बागायतदारांनी खताचे डोस देणे पावसाच्या ओढीमुळे लांबवले आहे. आता पाऊस सुरु झाल्याने खतांचे डोस देणे बागायतदार या आठवड्यात उरकून घेतील. त्यानंतर १५ ते २० दिवसांच्या फरकाने संजीवकाचा डोस देणे सुरु करता येईल. मात्र, आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर संजीवकाचा डोस देणे अजिबात फायदेशीर ठरणार नाही याचीही जाणीव बागायतदारांना आहे. निसर्गचक्राच्या फेऱ्यात आंबा बागायतदार यंदा सापडला आहे. अगतिकता व हतबलता यांची दाहक जाणीव करून देणारे असेच हे वातावरण आहे. जर-तर च्या चक्रात सापडून चुकीचे निर्णय व उत्पादन खर्चातील वाढीला आमंत्रण देणे यानंतरच्या कठीण काळात आंबा बागायतदाराला मुळीच परवडणारे नाही. कारण स्पर्धा व दलालांचा विळखा यामुळे बागायतदार आधीच जेरीला आला आहे. त्यामुळे सामूहिक निर्णय व सहकार्य यांच्याच जोरावर आता आंबा बागायतदार कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी तयार व्हायला हवा, असेच म्हणावे लागेल.