शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे, शेतकऱ्यांसाठी एकदा तरी कॉलर उडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 14:03 IST

लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत सांगायचे झाले तर लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न सोडवला नाही. त्यांनी फक्त कॉलर उडवण्याचे काम केलेले आहे. त्यांनी एकदा शेतकऱ्यांसाठी कॉलर उडवावी आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून बळीराजा शेतकरी संघटनेला सहकार्य करावे, असे मत बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्र्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देउदयनराजे शेतकऱ्यांसाठी एकदा तरी कॉलर उडवाबळीराजा शेतकरी संघटना लढवणार लोकसभेची निवडणूक :  पंजाबराव पाटील 

कऱ्हाड : लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत सांगायचे झाले तर लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न सोडवला नाही. त्यांनी फक्त कॉलर उडवण्याचे काम केलेले आहे. त्यांनी एकदा शेतकऱ्यांसाठी कॉलर उडवावी आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून बळीराजा शेतकरी संघटनेला सहकार्य करावे, असे मत बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्र्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

जीवनावश्यक कायद्यातून सर्व शेतमाल वगळला पाहिजे. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे नवीन कायदे बनवले पाहिजेत. यासाठी शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांना ताकद मिळावी व त्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी बळीराजा शेतकरी संघटना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरली आहे. येणारी निवडणूक ही शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची निवडणूक असणार आहे.कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बी. जी. पाटील, जिल्हाद्यक्ष साजिद मुल्ला, उन्मेष देशमुख, भीमाशंकर बिराजदार आदी उपस्थित होते.पंजाबराव पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे. सगळ्याच चाव्या बारामतीतून फिरताना दिसत आहेत. यशवंतराव चव्हाण यांचा सातारा जिल्हा आहे, त्यांचा विचार आज जिल्ह्यात कुठेही जोपासलेला पाहायला मिळत नाही.

बारामतीच्या चाव्यांवर सातारा जिल्ह्यातील खासदार आणि आमदार पळत आहेत. सातारा जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी जिल्ह्यातला माणूस प्रतिनिधी असला पाहिजे म्हणून सातारा जिल्ह्यातून बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून येणारी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी बी. जी. पाटील म्हणाले, आता कोणाची जिरवायची आणि कोणाला हरवायचं, यापेक्षा लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक लढवून ती जिंकायची, असा मी निर्णय घेतला आहे. रयतेचा जाहीरनामा आम्ही तयार करत असून, तो घेऊन येणारी निवडणूक सर्व ताकदीनिशी लढवणार आहोत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Satara areaसातारा परिसर