मालवण : अरबी समुद्राला आलेल्या उधाणाचा तडाखा चिवला बीच येथील रापणकर मच्छिमारांच्या नौकांना बसला. दोन्ही नौका (होड्या) जाळ्यांसह समुद्रात वाहत गेल्या. मात्र हा प्रकार लक्षात येताच स्थानिक मच्छिमारांनी घटनास्थळी धाव घेत होड्या व जाळ्या काढल्या. यात होड्या व जाळ्यांचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.गुरुवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दुसºया दिवशीही शुक्रवारी कायम होता. यात समुद्राला मोठे उधाण आले. या सागरी उधाणाचा फटका चिवला बीच येथील रापणकर मच्छिमारांच्या दोन होड्यांना बसला. समुद्राला मोठी भरती येणार असल्याची कल्पना असल्याने रापणकर मच्छिमारांनी आपल्या नौकावर काढल्या होत्या. मात्र, शुक्रवारी दुपारी आलेल्या मोठ्या उधाणात समुद्राचे पाणी सुरक्षित ठेवलेल्या होड्यांपर्यंत पोहोचले. यात महेश हडकर तसेच त्यांच्या होडी लगत अन्य एका रापण संघाची होडी अशा दोन होड्या जाळ्यांसह लाटांच्या पाण्याच्या तडाख्यात समुद्रात वाहून गेल्या.नौका सागरी किनारीउधाणाच्या पाण्यात होड्या व त्यातील जाळ्या वाहून जात असल्याचे स्थानिक रापणकर मच्छिमारांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोरीच्या सहाय्याने होड्यांना बांधून अथक परिश्रमाने या दोन्ही होड्या समुद्रातून बाहेर काढण्यात आल्या. यात दोन्ही होड्यांचे तसेच जाळ्यांचे मिळून सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली.सिंधुफोटो ०३मालवण चिवला बीच किनारी समुद्रात वाहून जाणाºया मासेमारी नौकांना रापणकर मच्छिमारांनी किनाºयावर आणले.
समुद्री उधाणाचा मालवण चिवला बीच येथील नौकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 17:32 IST
मालवण : अरबी समुद्राला आलेल्या उधाणाचा तडाखा चिवला बीच येथील रापणकर मच्छिमारांच्या नौकांना बसला. दोन्ही नौका (होड्या) जाळ्यांसह समुद्रात ...
समुद्री उधाणाचा मालवण चिवला बीच येथील नौकांना फटका
ठळक मुद्देसमुद्री उधाणाचा मालवण चिवला बीच येथील नौकांना फटकारापणकर मच्छिमारांनी जाळ्यांसह वाहून जाणाऱ्या होड्या वाचविल्या