शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडीजवळ भीषण अपघातातून कर्नाटकचे पाचही तरुण बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:55 IST

सिंधुदुर्गातील तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर एडगाव येथे रात्री 10 च्या सुमारास भीषण दुर्घटना घडली.

वैभववाडी(सिंधुदुर्ग): सिंधुदुर्गातील तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर एडगाव येथे रात्री 10 च्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. महामार्ग मधोमध खचल्याने कोल्हापूरहून वैभववाडीकडे येणारा ट्रक खड्ड्यात दणकून कोल्हापूरकडे निघालेल्या कारवर कोसळला. त्यामुळे कारचा ट्रकखाली सापडून चुराडा झाला. कारमधील चौघांना नागरिकांनी तातडीने बाहेर काढले. परंतु कारमध्ये अडकलेल्या युवकाने दीड तास मृत्यूशी झुंज दिली. दोन जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने ट्रक उभा केल्यानंतर नागरिकांच्या अथक परिश्रमांमुळे कारमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश आले. कारमधील पाचपैकी तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. कर्नाटकातील ते पाच तरुण गोव्याहून कोल्हापूरमार्गे मुंबईला निघाले होते. अपघातामुळे दोन्ही बाजूंना दोन किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग लागली होती. रात्री सव्वादहाच्या सुमारास ठप्प झालेली वाहतूक मध्यरात्री उशिरापर्यंत सुरळीत झाली नव्हती.