शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: चिरे वाहतूक करणारे पाच ट्रक पकडले, देवगड तहसीलदारांची कारवाई 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 27, 2023 18:52 IST

सिंधुदुर्ग : क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात जांभ्या दगडाचे चिरे वाहतूक करणाऱ्या पाच ट्रकांवर कारवाई करून एक लाख ४७ हजार ७७५ ...

सिंधुदुर्ग : क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात जांभ्या दगडाचे चिरे वाहतूक करणाऱ्या पाच ट्रकांवर कारवाई करून एक लाख ४७ हजार ७७५ रुपयांचा दंड देवगड तहसीलदारांनी ट्रकमालकांना ठोठावला आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.तालुक्यातील नांदगाव देवगड मार्गावरील तोरसोळे फाटा येथे पाच ट्रक मोठी वाहने चिरे वाहतूक करीत असताना अडवत ती ताब्यात घेतली आहे. ही पाचही वाहने देवगड तालुक्यातून कोल्हापूर कर्नाटकच्या दिशेने चिरे वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात देवगडचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रमेश पवार यांनी या वाहनांवर एक लाख ४७ हजार ७७५ रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे चिरे वाहतूक करणारे ट्रक हे देवगड तहसील कार्यालयाच्या परिसरात उभे करण्यात आले आहेत.गणेश चतुर्थी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपली वाहने घेऊन कोकणात येत असल्यामुळे अवजड वाहनांमधून चिरे वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी राजकीय पक्षांसह नागरिकांमधून करण्यात आली होती; परंतु, याला चिरे वाहतूक करणाऱ्या वाहनांनी तिलांजली देत चिरे वाहतूक सुरूच ठेवली. या मुजोर वाहनचालकांना अखेर तहसीलदार रमेश पवार यांनी चांगलाच दणका देत सुमारे पाच अवजड वाहने ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असले तरी चिरे वाहतूक करणाऱ्या वाहनांचे धाबे दणाणले आहेत.

चिरेखाण व्यावसायिकांचे धाबे दणाणलेया मोहिमेत देवगड तहसीलदार रमेश पवार यांच्या उपस्थितीत मंडळ अधिकारी चव्हाण, मंडळ निरीक्षक पावस्कर, तलाठी बोडके, नाडे या पथकाने ही कार्यवाही केली आहे. या मार्गावरून अवजड वाहने भरधाव वेगाने येतात. अपघातात दोन नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप होत होता. प्रशासनाने गंभीर दखल घेऊन या वाहनांवर कारवाई केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून चिरेखाण व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग