शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

मासेमारी बंद; नौका किनाऱ्यावर

By admin | Updated: June 1, 2015 23:52 IST

शासनाचा आदेश : १ जूनपासून प्रथमच अंमलबजावणी

रत्नागिरी : पावसाळा तोंडावर आल्याने शासनाच्या मत्स्य विभागाने यंदा प्रथमच १ जून ते ३१ जुलैपर्यंत दोन महिने खोल समुद्रातील मासेमारी पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्वच मच्छिमारांना दिले आहेत. त्यामुळे यंदाच्या मच्छिमारी हंगामाची इतिश्री झाली आहे. बहुतांश मच्छिमारांनी वारंवार होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे यापूर्वीच नौका शाकारणीला सुरुवात केली आहे. खोल समुद्रातील मासेमारी पावसाळ्यात बंद असते. मच्छिमारांचा हंगाम १५ आॅगस्ट ते १५ जून या कालावधीत असतो. या कालावधीमध्ये मासेमारी नौका खोल समुद्रामध्ये जाऊन मासेमारी करतात. चालू हंगाम संपण्यासाठी जेमतेम आठवडा शिल्लक राहिला आहे. या हंगामामध्ये मच्छिमारांवर वारंवार वादळी वारे, तसेच वारंवार होणाऱ्या वातावरणातील बदलाचा परिणाम खोल समुद्रातील मासेमारीवर झाल्याचा दिसून येत होता. सततच्या वातावरणातील बदलामुळे मच्छिमारांना अनेक दिवस मासेमारी बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे नौका मालकांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले होते. पावसाळ्याच्या कालावधीत माशांचा प्रजननाचा काळ असतो. या कालावधीत मासेमारी केल्यास माशांची अंडी, पिल्ले यांची मरतुक होईल. त्यासाठी या कालावधीत खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवणे हितावह असते. त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये समुद्र खवळलेला असतो. मोठ-मोठ्या लाटा उसळत असतात. त्यामुळे या कालावधीत मासेमारीला जाणे धोकादायक असते. या कारणाने पावसाळ्यात मासेमारीवर पूर्णत: बंदी घालण्यात आलेली आहे. १५ जून ते १५ आॅगस्ट या कालावधीमध्ये संपूर्ण मासेमारी बंद असते. मात्र, केंद्र शासनाने आता ही बंदी १ जूनपासून ३१ जुलैपर्यंत घातली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना जिल्ह्यातील सर्वच मच्छिमारांना दिली आहे. त्याप्रमाणे बहुतांश मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीला जाणे बंद केले आहे. शासनाच्या या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. (शहर वार्ताहर)