शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पर्ससीन नौकेला मत्स्य विभागाची नोटीस : मुरारी भालेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 19:30 IST

तपासणीत एक पर्ससीननेट नौका सापडून आली. या नौकेवर पर्ससीनची जाळी चढविली जात होती. त्यामुळे संबंधित नौका मालकाला बंदरातून नौका हलविण्यापूर्वी मत्स्य व्यवसाय विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी, अशी नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिली.

ठळक मुद्देपर्ससीन नौकेला मत्स्य विभागाची नोटीस : मुरारी भालेकर नौकेवर ट्रॉलिंग व पर्ससीननेटच्या मासेमारीचा परवाना

मालवण : सर्जेकोट बंदरात पर्ससीननेट धारकांची जाळी नौकेवर चढविण्यात येत असल्याचे मच्छिमारांच्या दांडी येथे आयोजित पहिल्या मत्स्यदुष्काळ परिषदेत निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत एक पर्ससीननेट नौका सापडून आली.

या नौकेवर पर्ससीनची जाळी चढविली जात होती. त्यामुळे संबंधित नौका मालकाला बंदरातून नौका हलविण्यापूर्वी मत्स्य व्यवसाय विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी, अशी नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिली.दरम्यान, महाराष्ट्र शासनाने परवानाधारक पर्ससीनधारकांकडून नियमबाह्य मासेमारी करणार नसल्याबाबत हमीपत्र लिहून घ्यावे आणि नियमबाह्य मासेमारी केल्यास त्या नौकेचा पर्ससीन परवाना रद्द करावा, अशी मागणी पारंपरिक मच्छिमारांनी यावेळी केली.दांडी येथे पारंपरिक मच्छिमारांची पहिली मत्स्यदुष्काळ परिषद घेण्यात आली. या परिषदेत सर्जेकोट बंदरात पर्ससीनधारकांकडून जाळी नौकेवर चढविली जात असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. १ जानेवारीपासून राज्याच्या सागरी हद्दीत या मासेमारीस पूर्णत: बंदी आहे. मात्र, त्यानंतरही समुद्रात एलईडी, पर्ससीननेटची मासेमारी सुरू असल्याचा आरोप मच्छिमारांकडून केला होता.

या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी मुरारी भालेराव यांनी सर्जेकोट बंदरात धडक देत तपासणी केली असता येथील मत्स्य व्यावसायिक रूजारिओ पिंटो यांच्या मारिया या नौकेवर पर्ससीननेटची जाळी चढविली जात असल्याचे दिसून आले.पिंटो यांच्या नौकेवर ट्रॉलिंग व पर्ससीननेटच्या मासेमारीचा परवाना असून हा परवाना रत्नागिरी जिल्ह्याचा आहे. यासंदर्भात नौका मालकाकडे केलेल्या चौकशीत नौका बंद पडल्याने ती सर्जेकोट बंदरात उतरविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मत्स्य परवाना अधिकारी भालेकर यांनी पिंटो यांना सर्जेकोट बंदरातून नौका हलविण्यापूर्वी मत्स्य व्यवसाय विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी अशी नोटीस बजावली आहे.

पर्ससीननेटच्या मासेमारीस बंदी असताना या नौकेवर पर्ससीनची जाळी कशी? असा प्रश्न मच्छिमारांनी केला आहे. शिवाय पर्ससीनच्या जाळ्यांच्या आकाराची तपासणी करून त्यात निश्चित केलेली जाळी नसल्यास कडक कारवाईची मागणी केली आहे.सीसीटीव्ही लावावेतपर्ससीन नौकेचे इंजिन बंद पडले म्हणून सर्जेकोट बंदरात नौका आणली हे पर्ससीनधारकाने पुढे केलेले कारण हास्यापद वाटत आहे. सागरी अधिनियमांमधील काही त्रुटींचा गैरफायदा पर्ससीननेटद्वारे बेकायदेशीर मासेमारी करणारे अजून किती दिवस घेणार असा आमचा केंद्र आणि राज्य सरकारला सवाल असून बंदरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशी मागणी पारंपरिक मच्छिमारांनी केली आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग