शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मिठमुंबरीत मच्छिमारी नौका उलटली

By admin | Updated: November 9, 2016 00:55 IST

चौघांना जीवदान : नौकेसह जाळ्याचे पाच लाख रूपयांचे नुकसान

देवगड : तालुक्यातील मिठमुंबरी-बागवाडी येथील नारायण तारी यांची चिंंतामणी ही मच्छिमारी नौका सोमवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमाराम तारामुंबरी नस्त या ठिकाणी खडकात अडकून समुद्रात उलटली. यामुळे नौकेवरील चौघे मच्छिमार समुद्रात बुडाले. सुदैवाने त्यांनी पोहत तारामुंबरी समुद्रकिनारा गाठल्याने मोठा अनर्थ टळला.या दुर्घटनेत नौकेचे (पात) व जाळ्यांचे मिळून पाच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. मिठमुंबरी बागवाडी येथील नारायण हरी तारी यांची त्यांच्या पत्नीच्या नमिता तारी यांच्या नावावरती मच्छिमार नौका आहे. ही नौका मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनाऱ्यावरून सोमवारी सायंकाळी ४.५0 च्या सुमारास मच्छिमारीसाठी समुद्रात गेली होती. या नौकेवरती नारायण हरी तारी (४०) यांच्यासह प्रथमेश प्रताप नेसवणकर (२४), हर्षद नारायण तारी (२०, सर्व, राहणार मिठमुंबरी बागवाडी) तर संतोष जगन्नाथ मुणगेकर (४५, रा. कातवण) हे नौकेवरील खलाशी मच्छिमारीस गेले होते. मच्छिमारी केल्यानंतर घरी परतत असतानाच तारामुंबरी स्मशानभूमीनजीक नस्त याठिकाणी रात्री १०:.३० च्या सुमारास महाकाय खडकामध्ये नौका आदळून समुद्रात उलटली. या दुर्घटनेत नौकेला तडे जाऊन नौका फुटली. तसेच खलाशी समुद्रात फेकले गेले. नौकेतील चौघांनाही पोहता येत असल्याने तारामुंबरी समुद्रकिनारी ते सुखरुप पोहोचले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. (प्रतिनिधी)पाच लाख रूपयांची हानीया घटनेची माहिती नारायण धुरी यांनी तारामुंबरी ग्रामस्थांना दिली. त्यानंतर चिंंतामणी ही नौका समुद्रकिनारी आणण्यास तारामुंबरी ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न केले. मात्र रात्र असल्याने ही नौका मंगळवारी ग्रामस्थांनी समुद्रकिनारी आणली. नौकेचे पूर्णत: नुकसान झाले असून नौकेवरील जाळ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे या नौका दुर्घटनेमध्ये नारायण तारी यांचे नौका व जाळी मिळून पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.