नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गेल्या दहा वर्षात सिंधुदुर्गात काँग्रेस प्रथम क्रमांकाचा पक्ष बनविला होता. तत्पूर्वी शिवसेनेत असतानादेखील सिंधुदुर्गात शिवसेना पहिल्या क्रमांकावर होती. त्यामुळे राणे आणि प्रथम क्रमांक हे गणित जुळले होते. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण लोकसभा निवडणुकीनंतर नाराज असलेले नारायण राणे यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर आपण पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रीय काम करणार असल्याचे सांगताना मागील आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा. झाले गेले विसरून जा आपल्याला तिन्ही जागा काँग्रेसला जिंकून द्यायच्या आहेत. असे आवाहन केले होते. मात्र, नंतरच चार दिवसात मुंबईत गेल्यावर गुरूवारी नारायण राणे यांनी पुन्हा आपला निर्णय बदलला आहे. त्यांनी येत्या सोमवारी मंत्री पदाचा राजीनामा देवून आपण मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचे मुंबईत पत्रकारांना सांगितले. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारायण राणे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व कार्यकर्त्यांमधून राणेंच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा शुक्रवारी रंगली होती.
प्रथम क्रमांकाचे गणित
By admin | Updated: July 18, 2014 23:14 IST