शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पहिला दिवस वाया

By admin | Updated: February 10, 2015 00:00 IST

हत्ती पकड मोहीम : दोनवेळा ‘डार्ट’ मारल्याची शक्यता; अफवांना ऊत

माणगाव : माणगाव येथे हत्ती पकड मोहिमेची सुरुवात सोमवारी सकाळपासूनच करण्यात आली. सायंकाळपर्यंत दोनवेळा जंगली हत्तींना भूल देण्याच्या औषधांचा ‘डार्ट’ मारल्याची चर्चा सुरू होती. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. प्रशिक्षित हत्तींसह कर्नाटकाहून दाखल झालेले पथक रात्री उशिरापर्यंत नानेलीच्या जंगलात, हत्तींच्या शोधार्थ फिरत होते. परिणामी हत्ती पकड मोहिमेचा पहिला दिवस वाया गेल्याचे दिसून आले.हत्ती पकड मोहीम सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. नानेली येथील जंगलात हत्तींचे स्थान निश्चित करण्यात आल्यानंतर जंगल परिसराभोवती ठिकठिकाणी वन कर्मचारी उभे करण्यात आले होते. ११ वाजण्याच्या सुमारास चारही प्रशिक्षित हत्ती डॉ. उमा शंकर यांच्या नेतृत्वाखाली माणगावच्या दिशेने नानेली जंगलात दाखल झाले. नानेली जंगलात चार वाजेपर्यंत हत्ती शोधमोहीम सुरू होती. दोन हत्ती नानेलीच्या बाजूने ढेपगाळ परिसरात चारच्या सुमारास बापू बागवे यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी त्याबाबत वन अधिकाऱ्यांना कल्पना दिली. त्यानंतर हत्ती पकड मोहिमेस वेग येऊन वन कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. हत्तींना डार्ट मारला असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वन कर्मचारी पाण्याचा कॅन घेऊन जंगलात गेले. मात्र, पुन्हा अर्ध्या तासाने परत माघारी परत फिरले. यावेळी रानटी हत्तींनी पथकाला हुलकावणी देऊन पुन्हा माणगावच्या दिशेने वाटचाल केली होती.पुन्हा वन कर्मचारी माणगावच्या दिशेने गेले. हत्ती पकड मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सायंकाळी सहाच्या सुमारास माणगावच्या बाजूने रानटी हत्तीचे ग्रामस्थांना दर्शन झाले. दरम्यानच्या काळात डॉ. उमाशंकर डार्ट मारल्यावर वाट चुकून जंगलात राहिल्याचीही चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती. प्रशिक्षित चारही हत्ती रात्री उशिरापर्यंत जंगलातच होते. या मोहिमेची अधिकृत माहिती कोणत्याही वन अधिकाऱ्यांकडून मिळत नसल्यामुळे या मोहिमेबाबत उपस्थितांची संभ्रमावस्था कायम होती. (प्रतिनिधी)