शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पहिला दिवस अफवांचाच

By admin | Updated: February 9, 2015 23:55 IST

हत्ती पकड मोहीम : प्रशिक्षित चारही हत्ती नानेलीच्या जंगलात

माणगाव : जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या जंगली हत्तींना पकडण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील पथकाने नानेलीच्या जंगलात ठाण मांडले आहे. मात्र, दिवसभराच्या परिश्रमानंतरही एकाही हत्तीला डार्ट मारण्यात वा पकडण्यात वन विभागाला यश आलेले नाही. मात्र, वन विभागाकडून या मोहिमेची कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नसल्याने उपस्थितांमध्ये मात्र, विविध प्रकारच्या अफवांना जोर चढला होता.हत्ती पकड मोहिम जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची मानली जात असून या मोहिमेला यश प्राप्त होईल, असेही वनविभागाने यापूर्वीही सांगितले आहे. त्याचप्रमाणे या बहुचर्चित हत्ती पकड मोहिमेला संपूर्ण तयारीनिशी वनविभागाने सोमवारी सुरुवात केली. त्यानुसार सकाळपासूनच वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी तयारी केली होती. नानेलीच्या जंगलात हत्ती असल्याचे खात्रीशीर वृत्त मिळाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी सकाळीच नानेली जंगलाच्या वेशींवर तैनात करण्यात आले. तसेच नागरिकांना जंगलात जाण्यास मज्जाव करण्यात आला. यानंतर सकाळी अकराच्या सुमारास प्रशिक्षित चार हत्ती नानेलीच्या जंगलात विविध मार्गांनी जंगली हत्तींच्या शोधार्थ जंगलात गेले. या प्रशिक्षीत हत्तींसह कर्नाटकहून आलेले पथकाचे कर्मचारी व डॉ. उमाशंकर हेही उपस्थित होते. सकाळपासूनच प्रशिक्षीत हत्ती जंगली हत्तींचा मागोवा काढत जंगल परिसरात फिरत होते. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास नानेली ढेपगाळ परिसरात बापू बागवे या ग्रामस्थाने जंगली हत्ती पाहिल्याचे वनविभागाला कळविले. त्यानंतर वन कर्मचारी पाण्याचे कॅन घेऊन नानेलीच्या जंगलात जाऊ लागताच हत्तीला डार्ट मारल्याची चर्चा उपस्थितांत होऊ लागली. जंगलात कॅन घेऊन गेलेले कर्मचारी सुमारे अर्ध्या तासाच्या अंतराने परत मागे आले. यावेळी हत्तीला मारण्यात आलेला डार्ट चुकल्याने हत्ती पुन्हा माणगाव जंगलाच्या दिशेने गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनीही माणगाव जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण केले. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुन्हा जंगली हत्तीला डार्ट मारल्याची माहिती मिळाली. मात्र, वनविभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळत नसल्याने या मोहिमेबाबत उपस्थितांमध्ये अफवांचे पीक आल्याचे दिसून येत होते. रात्री उशिरापर्यंत एकाही जंगली हत्तीला आंबेरीतील क्रॉलकडे आणण्यात आले नव्हते. तसेच कर्नाटकातून दाखल झालेले पथक प्रशिक्षीत हत्तींसह रात्री उशिरापर्यंत जंगली हत्तींचा माग काढत फिरत होते. (प्रतिनिधी)डॉक्टर वाट चुकलेसायंकाळी सहा वाजता माणगाव परिसरात रानटी हत्तींना पाहण्यात आले. मात्र, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हत्तीला डार्ट मारल्यानंतर डॉ. उमाशंकर जंगलात वाट हरवल्याचीही चर्चा उपस्थितांत रंगली होती.