शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

निमतवाडी येथील ५ बागांना आग

By admin | Updated: February 7, 2015 00:14 IST

मोहोर करपला : १० लाखांच्या नुकसानीचा अंदाज

शिरगांव : देवगड तालुक्यातील शिरगांव-निमतवाडी येथील दातरीचे भरडमध्ये पाच शेतकऱ्यांच्या आंबा-काजू बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून १० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.ओंबळ काझरवाडी रस्त्याला लागूनच निमतवाडी येथील शेतकऱ्यांच्या आंबा, काजूच्या बागा आहेत. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास रस्त्यानजीक लागलेली आग हळूहळू बागायतीमध्ये पोहोचली. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. बागायती आणि शेतकरी यांच्या घरामध्ये सुमारे दोन किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आग लागल्याचे समजेपर्यंत बहुतांश झाडे होरपळली होती. हातातोंडाशी आलेले उत्पन्न आगीत गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. दरम्यान शिरगांव-शेवरेचे सरपंच अमित साटम, तलाठी मधुकर बांदेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)बागेबरोबर कुंपणही जळून खाकया घटनेत दिलीप आईर यांच्या दोन बागांतील १८ वर्षांची १३० कलमे व १० काजू कलमे मोहरलेल्या स्थितीत पूर्णपणे होरपळली तर काही झाडांवर आंबा, काजू लागलेले होते. पुंडलिक सीताराम आईर यांची ३० कलमे व १०० काजू, मोतीराम शिवराम आईर यांची ५० आंबा व काजू कलमे, धाकू सीताराम राणे यांची सुमारे १५० काजू कलमे, काशिराम बापू पवार यांची २० वर्षांची १० कलमे, चंद्रकांत बयाजी जांभळे यांची गेल्या वर्षीच लागवड केलेली १० काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीची माहिती समजताच शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तरी आग सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत धुमसत होती. या पाच बागायतींची कुंपणेही जळून खाक झाली.