शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
3
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
4
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
5
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
6
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
7
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
8
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
9
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
10
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
11
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
12
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
13
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
14
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
15
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
16
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
17
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
18
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
19
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
20
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...

जझिंदरचे प्राध्यापिकेशी आर्थिक व्यवहार--पंजाब पोलिसांकडून खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 22:21 IST

सावंतवाडी : आंबोलीत गळफास घेऊन आत्महत्या केलेला युवक जझिंदर बलदेवसिंग विर्क याने अपहरण केलेली प्राध्यापिका दिलप्रीत कौर ही पंजाबमधील व्यास येथे कारमध्ये बसलेली शेवटची दिसली आहे.

ठळक मुद्देप्राध्यापिकेच्या घरात सापडली चिठ्ठीपंजाबमध्येच दिसली होती शेवटची पंजाब पोलिसांनी घटनेच्या आदल्या दिवशी आंबोली येथे त्याची गाडी थांबवून ठेवावी, असे सांगितले होते.

जेझिंदरच्या घरावर छापेलोकमत न्यूज नेटवर्कसावंतवाडी : आंबोलीत गळफास घेऊन आत्महत्या केलेला युवक जझिंदर बलदेवसिंग विर्क याने अपहरण केलेली प्राध्यापिका दिलप्रीत कौर ही पंजाबमधील व्यास येथे कारमध्ये बसलेली शेवटची दिसली आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यानंतर आंबोलीपर्यंत ती दिसलीच नाही, असे पंजाब पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जझिंदर याचे दिलप्रीत हिच्याशी काही आर्थिक व्यवहार होते. तशी चिठ्ठीही तिने आपल्या घरात लिहून ठेवल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे या तपासामागचा गुंता वाढत चालला आहे. तसेच जझिंदर हा ड्रग्स तस्करीत असल्याचेही पोलिसांनी मान्य केले आहे. त्याच्यावर पंजाबमध्ये गुन्हाही दाखल आहे. त्यामुळेच पंजाब पोलिसांनी जझिंदर याच्या घरावर छापेमारी केली आहे.आंबोली येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या जझिंदर विर्क याच्याबाबत आता नवनवे खुलासे होऊ लागले आहेत. पंजाब पोलिसांचे पथक नातेवाईकांसह पुन्हा एकदा सावंतवाडीत दाखल झाले असून, त्यांनी या घटनेची विस्तृत माहिती घेतली. तसेच पोलिसांचे जाबजाबब व पंजाबहून आलेल्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले आहेत. जझिंदर याची गेल्या वर्षभरातील माहिती पोलिसांनी गोळा केली आहे. यात जझिंदर याचे प्राध्यापिका दिलप्रीत हिच्याशी संभाषण आढळून येत आहे.मात्र, ११ सप्टेंबरला प्राध्यापिका दिलप्रीत ही जेझिंदर याच्याबरोबर घरातून निघून जाण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ती पोलिसांनी जप्त केली. त्यात ‘मी जेझिंदर याच्याशी जात आहे. आमचे दोघांचे आर्थिक व्यवहार आहेत. मात्र, माझ्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास जेझिंदर यालाच जबाबदार धरावे, असे तिने चिठ्ठीत म्हटले आहे. तर १४ सप्टेंबरला पंजाब पोलिसांत सुरजित सिंग ब्रा नावाच्या व्यक्तीने एक तक्रार दिली. त्यात दिलप्रीत हिचे जेझिंदर विर्क याने तीन लाखासाठी अपहरण केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पंजाब पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यात जेझिंदर हा जी कार घेऊन निघाला तिची सर्व माहिती गोळा केली. त्यात पंजाबपासून व्यासपर्यंत दिलप्रीत ही जेझिंदरबरोबर होती. तेथून पुढच्या प्रवासाला निघताना दिलप्रीत नसल्याने गूढ वाढले आहे. दिलप्रीत ही जेझिंदरच्या कारमध्ये बसलेली असल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्यास शहरातील एटीएमच्या बाहेरून मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.पंजाब पोलीस आपल्या मागावर आहेत, याची माहिती जेझिंदर याला मिळाल्याने तो घाबरला होता. त्यातच तो ज्या मार्गाने चालला होता त्याची सर्व माहिती पंजाब पोलिसांकडे होती. त्यामुळे पंजाब पोलिसांनी घटनेच्या आदल्या दिवशी आंबोली येथे त्याची गाडी थांबवून ठेवावी, असे सांगितले होते. पण तत्पूर्वीच त्याने आत्महत्या केली. पंजाब पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार दिलप्रीत हिचे तीन लाखासाठी अपहरण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, व्यासनंतर दिलप्रीत कुठे दिसलीच नाही. मग जेझिंदरने दिलप्रीतचे काय केले, याचे गूढ वाढले आहे.प्राध्यपिकेबाबत अद्याप माहिती नाही : पंजाब पोलीसजझिंदर याच्यासोबत आलेली प्राध्यापिका दिलप्रीत कौरबाबत अद्यापपर्यंत आम्हाला माहिती मिळाली नाही. पंजाबमधील व्यास येथे ती शेवटची दिसली. तेथून ती दिसली नाही. आम्ही तपास करीत आहोत. जझिंदर ज्या मार्गाने आला, त्या मार्गावरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील, असे यावेळी पंजाबचे पोलीस अधिकारी प्रवेश चोपडा यांनी सांगितले. तसेच हा युवक ड्रग्ज तस्कर होता. त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शनिवारी जझिंदरचा मृतदेह ताब्यात देणारजझिंदर याच्यामृतदेहाबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात आली नाही. तसेच त्याचे मित्र व शेजारी सावंतवाडीत आले, पण भाऊ किंवा वडील आले नसल्याने पोलिसांनी अद्यापपर्यंत मृतदेह ताब्यात दिला नाही. पण शुक्रवारपर्यंत मृतदेहाबाबतची कार्यवाही पूर्ण झाली तर शनिवारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल, असे यावेळी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी सांगितले.