शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

देवगड-जामसंडे नगरपंचायतीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: February 4, 2016 01:28 IST

प्रस्ताव लालफितीतून बाहेर : अंतिम अधिसूचना येत्या पंधरा दिवसांत

सिंधुदुर्गनगरी : गेली दहा वर्षे शासन दरबारी लालफितीत अडकलेल्या देवगड-जामसंडे नगरपंचायत स्थापनेच्या हालचालींना मंत्रालयीन पातळीवरून गती मिळाली असून, या नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना येत्या १५ दिवसांत जारी होण्याची शक्यता असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी बुधवारी सांगितले. सध्या नगरपंचायत स्थापनेचा हा प्रस्ताव मंजुरीसाठी न्याय व विधी आयोगाकडे आहे. त्या ठिकाणी मंजुरी मिळताच तो अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड हे तालुक्याचे ठिकाण व त्या लगतची जामसंडे ग्रामपंचायत यांचे एकत्रीकरण करून नगरपंचायत स्थापावी, अशी मागणी २००५ पासूनची आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींची लोकसंख्या सुमारे १७ ते १८ हजारांच्या घरात असून, या ठिकाणी नगरपंचायत स्थापन झाली, तर अनेक विकासकामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे ही नगरपंचायत स्थापन करावी, अशी मागणी अनेक राज्यकर्त्यांनी नगरविकास खात्याकडे केली होती. कणकवली नगरपंचायतीनंतर देवगड नगरपंचायतीची स्थापना होईल, अशी आशा होती मात्र, लालफितीत अडकल्याने ही नगरपंचायत अद्याप स्थापन झालेली नाही. (प्रतिनिधी