रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी आज, मंगळवारी जिल्ह्यातील पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला. राजापूर मतदारसंघातील हिंदू महासभेच्या प्रमिला भारती यांनी आपला अर्ज दाखल केला. दरम्यान, जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत संबंधित उपविभागीय कार्यालयातून एकूण ११ अर्ज विकले गेले. यात दापोलीतून मनसेचे वैभव खेडेकर आणि राजापुरातून मनसेच्या सुनील जठार, आदींचा समावेश आहे. आतापर्यंत ८२ अर्जांची विक्री झाली आहे.आज दापोलीतून सात अर्जांची विक्री झाली. त्यात मनसेच्या वैभव खेडेकरांचा समावेश आहे. गुहागरातून एकही अर्ज गेला नाही. चिपळुणातून तीन अर्जांची विक्री झाली. रत्नागिरीतून एक, तर राजापुरातून मनसेचे सुनील जठार यांनी स्वत:करिता अर्ज नेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातून पहिल्या दिवशी २९, तिसऱ्या दिवशी ४२ आणि आज ११ अशा एकूण ८२ अर्जांची विक्री झाली आहे.निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याच्या चौथ्या दिवशी आज राजापुरातून हिंदू महासभेच्या प्रमिला भारती यांनी पहिला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता हळूहळू अर्ज दाखल करण्यास सुरुवात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. (प्रतिनिधी)विधानसभा निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी दहा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते, तर आरक्षण असणाऱ्या उमेदवारांना पाच हजार अनामत रक्कम भरावी लागते. ही रक्कम उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट केली जाते.४ प्रमिला भारती यांनी करून दिली सुरुवात४ इतरांचे मुहूर्त उद्यापासूनच सुरू होणार४ आतापर्यंत ८५ अर्जांची विक्री
राजापुरातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Updated: September 23, 2014 23:55 IST