शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

By admin | Updated: July 23, 2016 23:52 IST

मनसेची मागणी : उत्तम पवार मृत्यूप्रकरण; रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांत भरा : राजन दाभोलकर

कणकवली : महामार्गावरील खड्ड्यांमुळेच तलाठी उत्तम पवार यांचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी महामार्ग प्राधिकरण नियंत्रण मंडळ व अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व क्वालिटी कंट्रोल विभागही त्यास जबाबदार असल्याने संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मनसेची मागणी असल्याचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी येथे सांगितले.येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसे शहर अध्यक्ष संतोष कुडाळकर, बिडवाडी विभागीय अध्यक्ष अनंत आचरेकर आदी उपस्थित होते.यावेळी राजन दाभोलकर म्हणाले, सिंधुदुर्गातील विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना ठेकेदार तसेच संबंधित खातेप्रमुख जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी आठ दिवसांपूर्वी मनसेतर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करून त्याच्या प्रति जिल्हाधिकारी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्याची दखल घेऊन रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आवश्यक होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने मनसेतर्फे मानवी हक्क आयोगाकडे दाद मागण्यात येणार आहे. तसेच सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका ठेकेदारांतर्फे बनविलेल्या रस्त्यांवर खड्डे पडून अपघात होत असल्यामुळे संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय रस्त्यांची कामे सुधारणार नाहीत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासकीय अधिकारी म्हणून असलेल्या अधिकारांचा वापर करून सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांत भरण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.युतीचे पालकमंत्री,आमदार तसेच खासदार हे रेल्वे तसेच विमानाने फिरू लागल्याने त्यांना रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत. हे नेते स्वत:च्या वाढदिवसावर लाखो रुपये उधळतात, तर मग जनतेसाठी स्वत:च्या खिशातून खर्च करून रस्त्यावरील खड्डे का बुजवित नाहीत? पूर्वी काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार होतो, असे युतीचे नेते ओरडत होते. मग आता ते सत्तेत असताना नेमके काय चालले आहे? पालकमंत्री आता गप्प का आहेत?असा प्रश्नही दाभोलकर यांनी यावेळी उपस्थित केला.(वार्ताहर)पवारांच्या कुटुंबीयांची जबाबदारी घ्या !बिबवणे येथील महिलेच्या तसेच उत्तम पवार यांच्या कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी. खासदार व पालकमंत्र्यांनी पवार यांच्या मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च करावा. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी स्वीकारुन आर्थिक मदत द्यावी, असेही राजन दाभोलकर यावेळी म्हणाले.जिल्हा प्रशासनाची दडपशाही !सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने जनतेचा आवाज दडपून टाकण्यासाठी गेले वर्षभर मनाई आदेश जारी केल्याने आम्हाला कोणतेही आंदोलन करता येत नाही, अशी खंतही दाभोलकर यांनी यावेळी व्यक्त केली.