शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

चिपळुणात रिक्षावाल्यांची अस्तित्त्वाची लढाई सुरु

By admin | Updated: May 28, 2015 00:55 IST

पोटावरचे जगणे : काळाच्या ओघात रिक्षाचालक भरडला जातोय...

संजय सुर्वे -Èशिरगावएस. टी. थांब्यापासून रेल्वे स्थानकापर्यंत चिपळूण शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातील गल्लीबोळात प्रवाशांना पोहोचवणारा, नियमित अनेक बालकांना शाळेत ने-आण करणारा रिक्षावाला काळाच्या ओघात भरडला जात असून, त्याच्या अस्तित्त्वाची लढाई सुरू झाली आहे.शासनाने ठरवून दिल्यानुसार मीटरप्रमाणेच भाडे घ्यावे, अशी रास्त अपेक्षा बाळगणाऱ्या प्रवाशांना त्यांची व्यथा समजून येत नाही. शासन मीटर भाडे घेण्यासाठी नियम बनवते. त्यानुसार गल्ली बोळातली मुख्य रस्त्याची स्थिती असते का? हा प्रश्न विचारला जात नाही. रस्त्यापासून कमी उंच असणाऱ्या रिक्षाला नेहमीच मोठ्या खड्ड्यात कसरत करावी लागते. उघड्या रिक्षात सर्व ऋतुत आहे, त्या ठिकाणी स्वत:चा बचाव करत बसावे लागते. महत्त्वाची बाब म्हणजे आपले असणारे ग्राहक काही क्षणात वडापमध्ये बसून जाताना पाहताच त्यांना नेहमी वाईट वाटते. आपल्या रिक्षाचे मीटर, ड्रेस, पासिंग पाहणारे यावेळी गप्प का? असा सवाल विचारला जात आहे. मुख्य रस्त्यावरच्या थांब्यावरुन येणारे ग्रामस्थ चाकरमानी हा ग्राहक ठरलेला होता. मात्र, आता प्रत्येक घरात किमान एक वाहन आले आहे. तसेच अडल्या वेळेला मोबाईलची साथ मिळाल्याने घरातून स्थानकापर्यंत व्यक्तीला ने-आण करणे सुलभ झाले. हे रिक्षावाल्यांचे धंद्यासाठी मारक बनले आहे. ग्रामीण भागात होणारे अपघात आणि आजारपण यामध्ये क्वचित रिक्षाचा वापर होताना दिसतो. त्यामुळे रिक्षा व्यवसायावर अवलंबून असणारे नेहमीच तणावाखाली असतात.आपला व्यवसाय सावरण्यासाठी चिपळूण बहादूरशेख, सती, खेर्डी पिंपळी मार्गावर एकत्रित येऊन रिक्षाचालकांनी वडापवाल्यांसोबत समझोता केला आहे. लांब पल्ल्याच्या थांब्यासाठी प्रवासी घेण्याचा कडक नियम पाळला जातो का? यासाठी रोज लक्ष द्यावे लागत आहे. वडापवाले नोकरी, उद्योग नसल्याने खासगी प्रवासी वाहतूक करतात. त्यांना अर्थपूर्ण सहानुभूती मिळते. पण याच उद्देशाने कोणी रिक्षा व्यवसायात आला तर गणित बदलते. संघटनात्मक दृष्टीने पाहता दिवसात अनेक अबालवृध्दांची सेवा करणाऱ्या रिक्षावाल्यांची समस्या शासनाकडे आक्रमक होऊन मांडणारी यंत्रणा (संघटना) दिसून येत नाही. शहरात मुख्य ठिकाणी नंबरप्रमाणे वाट पाहायची. येणारे ग्राहक किती जवळ-लांब याची माहिती नाही, पण तरीही आशावादी रिक्षावाला हळूहळू शेअर रिक्षा नावाने रुप बदलू लागला आहे.