शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना निपाहची भीती, तातडीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 16:23 IST

पावसाळ्यात उद्भवणारे जलजन्य साथरोग आणि निपाह आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून याबाबत सर्व विभागांनी आवश्यकती खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंंत, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा बैठकीत दिले आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हावासीयांना निपाहची भीती, तातडीची बैठक  रेश्मा सावंत, के. मंजुलक्ष्मी यांचे मार्गदर्शन; घाबरून न जाण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : पावसाळ्यात उद्भवणारे जलजन्य साथरोग आणि निपाह आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून याबाबत सर्व विभागांनी आवश्यकती खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंंत, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा बैठकीत दिले आहेत. तसेच निपाह तापाच्या आजाराबाबत जनतेने घाबरून जाऊ नये. काही शंका असल्यास थेट आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहनही साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रशांत सवदी यांनी केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात काही भागात जलजन्य साथरोग साथीचा आरोग्य यंत्रणेसह जनतेला सामना करावा लागतो. तसेच पावसाळा जवळ आल्याने व निपाह आजाराचा प्रादुर्भाव अन्य राज्यात वाढत असल्याने याबाबत उपाययोजना आखण्यासाठी तातडीची बैठक जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे तसेच पशुसंवर्धन विभाग, वनविभाग ग्रामपंचायत विभागांसह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.गोवा राज्यात निपाहचा संशयित रुग्ण सापडला आहे. तो केरळ येथून गोवा येथे रेल्वेने आला आहे. हा प्रवासी निपाहचा संशयित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती.

जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची मंगळवारी ओरोस येथे बैठक झाली असून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. वटवाघळांच्या अधिवासांची तपासणी केली जाणार आहे. अधिवासाच्या ठिकाणांची तपासणी करून वटवाघळांची सॅम्पल तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.निपाह बाबत कक्ष स्थापन होणारनिपाह आजाराबाबत जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडून आवश्यकती खबरदारी घेण्यात येत आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विशेष कक्षदेखील स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेने या आजाराला घाबरून जाऊ नये. तसेच या आजाराबाबत शंका असल्यास जवळच्या आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.ही आहेत निपाहची लक्षणेताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोपाळूपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे, मेंदूज्वर ही ह्यनिपाहह्ण आजाराची लक्षणे आहेत. रुग्णामध्ये ही लक्षणे आढळून आल्यास त्यांनी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल होऊन उपचार घ्यावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.पडलेली फळे खाऊ नयेतनिपाह हा आजार मुख्यत: वटवाघळामधील विषाणूंमुळे होतो. या विषाणूचा संसर्ग जंगलातील तसेच झाडावरून पडलेली फळे खाल्ल्याने होतो. त्यामुळे पडलेली तसेच वटवाघळाने खालेली फळे नागरिकांनी खाऊ नयेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. 

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूsindhudurgसिंधुदुर्ग