कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेकेला आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे कणकवलीतील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे चित्र दिसत आहे.महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या येथील संपर्क कार्यालयात नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांनी आमदार नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी सोमनाथ गायकवाड, स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, शहराध्यक्ष समीर नलावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, नगरसेवक गणेश हर्णे आदी उपस्थित होते.भाजप नेते संदेश पारकर यांच्या गटाच्या असलेल्या माधुरी गायकवाड यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केल्याने नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवलीतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
सिंधुदुर्ग : कणकवली नगराध्यक्ष स्वाभिमान पक्षात, राजकीय समीकरणे बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 15:54 IST
कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे कणकवलीतील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे चित्र दिसत आहे.
सिंधुदुर्ग : कणकवली नगराध्यक्ष स्वाभिमान पक्षात, राजकीय समीकरणे बदलणार
ठळक मुद्देकणकवली नगराध्यक्ष स्वाभिमान पक्षातराजकीय समीकरणे बदलणार