शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या दुचाकीवर आंब्याचे झाड कोसळल्याने बाप-लेक जखमी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 25, 2025 23:01 IST

अवकाळी पावसाचा परिणाम ;मांगेली कुसगेवाडी येथील दुर्घटना

महेश सरनाईक दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : मांगेली कुसगेवाडी येथे काजू बागायतीमधून घरी परतत असताना वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसात आंब्याचे झाड दुचाकीवर पडून बाप - लेक गंभीर जखमी होण्याची दुर्घटना घडली.यात मुलगी गौरी अरविंद गवस ( ११ ) हीला गंभीर दुखापत झाल्याने तिला उपचारासाठी म्हापसा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले  तर वडील अरविंद गवस ( ४२) हे किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर साटेली- भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले 

 गेल्या काही दिवसात तालुक्यात  कमालीची उष्णता वाढली होती. वाढत्या गरमीमुळे अंगाची लाही लाही होत असताना मंगळवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दोडामार्ग तालुक्यात हजेरी लावली. अनेक ठिकाणी पडझडीचे प्रकारही घडले.जवळपास दोन तासाहून अधिक काळ अवकाळी पाऊस बरसला.मात्र या अवकाळी पावसाचा फटका काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी गेलेल्या मांगेली कुसगेवाडी येथील बाप - लेकीला बसला. अरविंद गवस हे आपली मुलगी गौरी हिला घेऊन काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी गेले होते. मात्र अचानक  ढग दाटून येऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काजू बागेतुन त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला .

दुचाकीवर बसून ते घरी येत असताना घराजवळचे एक आंब्याचे झाड त्यांच्या चालत्या दुचाकीवर मोडून पडले आणि ती दोघेही बाप - लेक त्याखाली चिरडले गेले. यातून कशी बशी सुटका करून घेत अरविंद गवस यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. लागलीच गावकरी त्याठिकाणी धावून गेले व त्यांनी दोघांनाही बाहेर काढले.यात गौरी हिला गंभीर मार लागला तर तिचे वडिल किरकोळ जखमी झाले. दोघांनाही साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र गौरीची प्रकृती गंभीर असल्याने तिला अधिक उपचारासाठी गोवा-म्हापसा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.