शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशीही दोडामार्गमधील उपोषण चालू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 18:00 IST

वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांच्या निलंबनासाठी सिद्धेश राणे व संदेश राणे यांनी छेडलेले उपोषण तिसऱ्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बेदखल झाले. अवैध्य वृक्षतोड, वनबंधारे व सौरऊर्जा कुंपणाचे दर्जाहीन काम याबाबत राणे यांनी लक्ष वेधले. कार्यवाही करा अन्यथा उपोषण मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देमागे हटणार नाही घेतला पवित्रावनअधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

दोडामार्ग : वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांच्या निलंबनासाठी सिद्धेश राणे व संदेश राणे यांनी छेडलेले उपोषण तिसऱ्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बेदखल झाले. अवैध्य वृक्षतोड, वनबंधारे व सौरऊर्जा कुंपणाचे दर्जाहीन काम याबाबत राणे यांनी लक्ष वेधले. कार्यवाही करा अन्यथा उपोषण मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.दोडामार्ग येथे वनविभाग अधिकाऱ्यांच्या विरोधात छेडण्यात आलेल्या उपोषणाला तिसऱ्या दिवशी अँटी करप्शन फौंडेशन आॅफ इंडिया व ह्युमन राईट्स या अशासकीय संस्थेच्या प्रतिनिधींनी आंदोलनाला भेट दिली. याप्रकरणी आम्ही वनाविभागाशी याबाबत चर्चा केली आहे.

संबंधित अधिकारी आंदोलन करते दोषी असल्याचे आरोप करत आहेत. जर आंदोलन करते दोषी आहेत. तर त्या अधिकाऱ्यांनी तसे पुरावे देऊन या प्रकरणातील संपूर्ण माहिती जाहीर करावी. अवैध वृक्षतोड झालेली आहे.सौर कुंपण काम आणि वनबंधारे निकृष्ट दर्जाचे आहे. असे उपोषणकर्त्यांनी मुद्दे मंडले आहेत. याचा पारदर्शक कागदोपत्री पुरावे वनविभागाने सादर करावेत. शासनाकडून २३ कोटी वृक्ष लागवड करण्यात आलेले आहेत.

यांचेही पुराव्यासह स्पष्टीकरण वनविभागाने द्यावे अन्यथा याविरुद्ध आम्ही आवाज उठवू असा इशारा यावेळी राष्ट्रीय अँटी करप्शन फौंडेशन आॅफ इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय समन्वयक प्रशांत बोर्डेकर व ह्युमन राईट्स इंटरनॅशनल संस्थेच्या उपजिल्हा समन्वयक अश्विनी शिरोडकर यांनी दिला आहे.

वनाविभागातील एक कर्मचारी हा शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी यांच्यावर आर्थिक देवाण घेवाणीचा आरोप करत आहे. त्याचेही पुरावे त्यांनी सादर करावेत अन्यथा उग्रआंदोलन छेडण्याचा इशारा संस्थांकडून देण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव व कार्यकर्त्यांनी उपोषणकर्त्यांना शुक्रवारी भेट दिली. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी माझ्याकडून शासन स्तरावर सर्व कामाची चौकशी करण्यासाठी प्रयत्न करतो असे स्पष्ट केले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, दोडामार्ग तालुका अध्यक्ष महादेव बोर्डेकर, शहराध्यक्ष चांदेलकर, कार्यकर्ते सुदेश तुळसकर, अविनाश गवस, सुशांत राऊत, उल्हास नाईक आदी उपस्थित होते. 

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग