शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

शेतकऱ्यांनी शाश्वत काजू उत्पादन घ्यावे

By admin | Updated: March 10, 2017 22:07 IST

दीनानाथ वेर्णेकर : वेंगुर्लेत काजू उत्पादकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

वेंगुर्ले : काजू उत्पादन आणि प्रक्रिया या प्रशिक्षणाचा उपयोग करून काजू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी फक्त उत्पादनावर समाधान न मानता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत काजू पीक उत्पादन घ्यावे व त्यावर प्रक्रिया करून जास्तीत जास्त नफा मिळवावा, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोसचे सचिव दीनानाथ वेर्णेकर यांनी केले.कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग, काजू आणि कोको विकास संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दर्याराजा रिसॉर्ट येथे ‘काजू उत्पादन व प्रक्रिया तंत्रज्ञान’ या विषयावर शेतकऱ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन दीनानाथ वेर्णेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कीटकशास्त्रज्ञ प्रा. बाळकृष्ण गावडे, मृदशास्त्रज्ञ प्रा. विकास धामापुरकर, कृषी अधिकारी एस. व्ही. राऊळ, आदी, मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रा. विकास धामापुरकर यांनी जमीन सुपीकता व्यवस्थापन व काजूमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करून उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, तसेच काजू पिक उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्र्रव्य पद्धत, गुणात्मक कार्य, माती परीक्षणावरून काजू पिकामध्ये व्यवस्थापन, काजू पिकांचे सिंधुदुर्ग कृषी विकासामध्ये योगदान याविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रा. बाळकृष्ण गावडे यांनी सिंधुदुर्गातील काजू पिकात आढळणारी मुख्य कीड व रोगांची लक्षणे त्यासंबंधीच्या उपाययोजना, शाश्वत काजू पीक उत्पादनात कीटकनाशकांचा उपयोग, गुणात्मक व दर्जेदार उत्पादनासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)तंत्रज्ञान अवघत कराकाजू उत्पादन व प्रक्रिया तंत्रज्ञानविषयी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विकास प्रतिष्ठानमार्फत राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळे काजू प्रकल्प, तसेच काजू शेतकऱ्यांना कृषी महोत्सवाची माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी महोत्सवात सहभागी होऊन नवीन तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी, असे आवाहन वेर्णेकर यांनी केले.