शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हत्तींच्या पाठलागात शेतकरी जखमी

By admin | Updated: May 12, 2017 22:49 IST

हत्तींच्या पाठलागात शेतकरी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कदोडामार्ग : जंगली हत्तींनी पाठलाग केल्याने त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी पळताना खाली पडल्याने बाबरवाडीतील शेतकरी चंद्रकांत लक्ष्मण गवस (वय ६४) हे गंभीर जखमी झाले. त्यांना साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. केवळ दैव बलवत्तर म्हणून हत्तींच्या हल्ल्यातून ते सुदैवाने वाचले. दरम्यान, या घटनेची माहिती हेवाळे गावचे सरपंच संदीप देसाई यांनी वनविभागाला दिल्यावर सहायक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक व दोडामार्गचे वनक्षेत्रपाल सचिन आठवले हेवाळेकडे रवाना झाले होते. सध्या तिलारी खोऱ्यात हत्तींच्या दोन कळपांचा वावर सुरू आहे. पूर्वी या भागात चार हत्तींचा कळप होता. मात्र, आता त्यात नव्याने आणखीन सात हत्तींच्या कळपाची भर पडली आहे. दोन दिवसांपासून हा कळप बोरयेवाडी व ठाकूरवाडीत नुकसान करीत आहे. बुधवारी व गुरुवारी रात्री तेथील महादेव ठाकूर व राजाराम ठाकूर यांच्या बागायतीत हत्तींनी घुसून नारळ, केळी व पोफळीच्या झाडांचे अतोनात नुकसान केले होते. याच माडाच्या झाडांची झावळे आणण्यासाठी चंद्रकांत गवस हे बागेत गेले होते. यादरम्यान अडगळीत असलेल्या हत्तींच्या कळपातील एका हत्तीने गवस यांच्यावर चाल केली. समोर हत्तीला बघून गवस यांची बोबडीच वळली. हत्ती त्यांचा पाठलाग करीत गवस यांच्या पाठिमागे लागला. त्याच्यापासून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी चंद्रकांत गवस जीवाच्या आकांताने आरडाओरड करीत धावू लागले. मात्र, ठेच लागून खाली पडल्याने ते गंभीर जखमी झाले. तोपर्यंत गवस यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ त्याठिकाणी पोहोचले होते. त्यांनी गवस यांचा पाठलाग करणाऱ्या हत्तीला जंगलात पिटाळून लावले. पुढ्यात साक्षात मृत्यू उभा असताना केवळ दैव बलवत्तर म्हणूनच ते हत्तीच्या हल्ल्यातून बचावले. त्यांना साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हेवाळे सरपंचांकडून आमरण उपोषणाचा इशारा हेवाळेत हत्ती बंदोबस्तासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची ग्वाही वनविभागाने देऊन सुध्दा ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे वनविभागाच्या विरोधात आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सरपंच संदीप देसाई यांनी दिला आहे.