सावंतवाडी, दि. 2 - आंबोली-कावळेसाद येथील दोन हजार फूट खोल दरीत पडलेल्या युवकांचे मृतदेह बाहेर काढण्यात बुधवारीही अपयश आले. सायंकाळी ५ वाजता शोधमोहीम थांबविण्यात आली. खराब हवामान व धबधब्यांमधून येणारे पाण्याचे प्रचंड लोंढे यामुळे मृतदेह बाहेर काढणे अवघड झाले आहे. इम्रान याचा मृतदेह असलेल्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने मृतदेह ताब्यात घेण्यात अपयश आले. तर प्रताप याचा मृतदेह शिरशिंगे येथे वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आजच्या शोधमोहिमेत हिल राइडर्स एंड हायकर्स, समिट अँडव्हेंचर्स कोल्हापूरचे प्रमोद पाटील, विनोद कांबोज, सागर बकरे, विनायक काणेकर, मयूर लवटे, सचिन नरके, प्रसाद आडनाईक, वैभव जाधव, तर सांगेली आपत्कालीन टीमचे बाबल अल्मेडा, किरण नार्वेकर, अभय किनळोस्कर, पंढरीनाथ राऊळ, फिलिप आल्मेडा, संतान आल्मेडा, गुरुनाथ सावंत, संतोष नार्वेकर, सचिन नार्वेकर आदी उपस्थित होते.
आंबोलीत दरीत पडलेल्या तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात अपयश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 22:56 IST