शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
3
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
4
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
5
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
6
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
7
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
8
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
9
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
10
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
11
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
12
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
13
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
14
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
15
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
16
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
17
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
18
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
19
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
20
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड

अतिउत्साह ठरतोय जीवघेणा

By admin | Updated: July 21, 2015 00:55 IST

मद्यपी पर्यटकांना आळा घाला : शासनाने सुरक्षेच्यादृष्टीने गांभिर्याने घेणे गरजेचे

सिद्धेश आचरेकर ल्ल मालवण सागरी पर्यटनाचा विचार करता तारकर्ली व देवबाग जगाच्या कानावर कानाकोपऱ्यात पोहोचले. येथील स्वच्छ व मनमोहक समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतात. मात्र अलिकडील काळात अतिउत्साही पर्यटकांचा उत्साह त्यांच्या जीवावर बेततो आहे. गेल्या काही वर्षात पर्यटकांचे हॉटस्पॉट असलेल्या या समुद्रकिनाऱ्यांवर बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी लाखो देशी विदेशी पर्यटक येथील पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटतात. मात्र पर्यटकांच्या सुरक्षेच्या बाबतीत शासनाचे अक्षम्य दुर्लक्षच दिसून येते. तारकर्ली-देवबाग किनारी समुद्रात आजतागायत अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. अशा घटना घडल्यास प्रत्येकवेळी जीवरक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र यावर शासनस्तरावरून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. पर्यटकांच्या मृत्यूस त्यांचा अतिउत्साहीपणा कारणीभूत असला तरी शासनाने पर्यटन हे विकासाचे माध्यम म्हणून पाहताना पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना आखणे आवश्यक आहे. पावसाळी हंगामात समुद्रात मासेमारी व पर्यटन व्यवसाय करण्याची शासनाकडून १ जून ते ३१ जुलै असा बंदी कालावधीचे निर्देश आहेत. असे असताना शासनाचे नियम धाब्यावर बसवून मच्छिमार किवा अतिउत्साही पर्यटक जीव धोक्यात घालून समुद्रात उतरतात. अतिउत्साही पर्यटकांमध्ये सूचनांचे पालन न करता आपल्या मर्जीनुसार काहीजण समुद्रात उतरून मौजमस्ती करतात. पावसाळी हंगामात समुद्री लाटा उसळत्या आणि वेगात असतात. लाटांच्या तडाख्यात सापडल्यास मृत्यूचे दर ठोठावे लागते. याची प्रचिती गेली कित्येक वर्षे येत आहे. पर्यटक हे एक किंवा दोन दिवसांच्या टूरवर आलेले असतात. मालवण, तारकर्लीसारख्या नयनरम्य ठिकाणी वर्षा सहली आयोजित केलेल्या असतात. स्वच्छ किनाऱ्यांची सर्वांनाच भुरळ पडते. जिल्ह्याबाहेरील पर्यटकांना समुद्राचे मोठे आकर्षण असते. केव्हा एकदा पाण्यात उतरतो याची उत्सुकता असते. तारकर्ली समुद्र किनारा ‘डेंजर झोन’ आहे. पर्यटक समुद्रस्नानाचा आनंद घेता घेता समुद्रात हळूहळू आत जाऊ लागतात. याची त्यांना कल्पनाही येत नाही. आणि दुर्दैवाने एखाद्या भयंकर लाटांचा तडाखा सोसावा लागतो अन प्राणही गमवावे लागतात.