शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

आंगणेवाडी यात्रेसाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज!, भाविकांच्या सोयीसाठी जादा बस सोडण्यात येणार

By सुधीर राणे | Updated: March 1, 2024 16:58 IST

एसटी महामंडळाच्यावतीने यंदा १ मार्च रोजी रात्री १० वाजल्यापासून बस सेवा सुरू करण्यात आली आहे

कणकवलीः मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेसाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्याच्या विविध आगारातून आणि विविध भागातून एसटीच्या १४५ बस सोडण्यात येणार आहेत. भराडी देवीच्या यात्रेसाठी लाखो भाविक सिंधुदुर्गात दाखल होत असतात. २ मार्चला ही यात्रा होत असून एसटीच्यावतीने  बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्यावतीने यंदा १ मार्च रोजी रात्री १० वाजल्यापासून बस सेवा सुरू करण्यात आली आहे.प्रवाशांचे भारमान पाहून रेल्वे स्टेशन पासून एसटी आगारापर्यंत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. याचबरोबर कुडाळ ते आंगणेवाडी २२ गाड्या, कसाल हिवाळेमार्गे आंगणेवाडी ४ गाड्या, कसाल, खोटले ते आंगणेवाडी ५ गाड्या, निरुखे, पांग्रड ते आंगणेवाडी ३ गाड्या, पणदूर, ओरोस ते आंगणेवाडी १ गाडी अशा कुडाळ येथून ३५ गाड्या धावतील. मालवण तालुक्यातील मालवण बस आगार ते आंगणेवाडी २० गाड्या, टोपीवाला हायस्कूल ते अंगणेवाडी ३ गाड्या, देवबाग तारकर्ली ते आंगणेवाडी ४ गाड्या, आनंदव्हाळ ते आंगणेवाडी, डांगमोडे ते आंगणेवाडी, सर्जेकोट ते आंगणेवाडी, मालोंड ते आंगणेवाडी प्रत्येकी १ गाडी, मसुरे ते आंगणेवाडी ६ गाड्या, चौके, देवली, आंबेरी ते आंगणेवाडी २ गाड्या , देवली ते वायरी मार्गे आंगणेवाडी १ गाडी, वराड ते आंगणेवाडी २ गाड्या , तळगाव, सुकळवाड ते आंगणेवाडी २ गाड्या, तिरवडे, मसुरे ते आंगणेवाडी २ गाड्या , कट्टा, कुणकुवण ते आंगणेवाडी १ गाडी, धामापूर ते आंगणेवाडी २ गाडया धावणार आहेत. तालुक्यातून ४९ बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. कणकवली आगारातून आंगणेवाडी ३९ गाड्या, अजगणी, असरोंडी मार्गे आंगणेवाडी २ अशा ४१ गाड्या सोडण्यात येणार आहेत. देवगड तालुक्यातील देवगड आगार ते आंगणेवाडी २, आचरा ते आंगणेवाडी ४, हिंदळे, मुणगे ते आंगणेवाडी ३ गाड्या, तर तोंडवली, तळाशील ते आंगणेवाडी १ गाडी, कुडोपी ते आंगणेवाडी १ गाडी, आरे, निरोम ते आंगणेवाडी १ गाडी , आचरा, चिंदर, त्रिंबक ते आंगणेवाडी १ गाडी अशा एकूण १३ गाड्या धावणार आहेत. विजयदुर्ग आगारातून विजयदुर्ग आंगणेवाडी ५ गाड्या तर वेंगुर्ले आजारातून पाट, परुळे (आडारी मार्गे) ते आंगणेवाडी २ बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. भराडी देवीच्या यात्रेसाठी तयार केलेल्या एसटी आगारांमध्ये नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत. या गाड्यांमधून नियमित सवलतही प्रवाशांना मिळणार आहे. एसटीच्या या सेवेचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग