शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आंबा कॅनिंगमुळे बागायतदारांची पिळवणूक, किलोला २0 रूपयांचा माफक दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 10:55 IST

देवगड तालुक्यामध्ये आंबा कॅनिंग व्यवसायाला सुरूवात झाली. मात्र कॅनिंगचा प्रति किलो २० रुपये माफक दराने घेत असलेला आंबा हा बागायतदारांची पिळवणूक करणारा आहे असे बागायतदारांमधून बोलले जात आहे. आंबा बागायतदारांची पिळवणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देबागायतदारांची नाराजी, कृषी विभागाने भाव ठरवून देण्याची मागणी आंबा कॅनिंगमुळे बागायतदारांची पिळवणूक, किलोला २0 रूपयांचा माफक दर

देवगड : तालुक्यामध्ये आंबा कॅनिंग व्यवसायाला सुरूवात झाली. मात्र कॅनिंगचा प्रति किलो २० रुपये माफक दराने घेत असलेला आंबा हा बागायतदारांची पिळवणूक करणारा आहे असे बागायतदारांमधून बोलले जात आहे. आंबा बागायतदारांची पिळवणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे.कृषी विभागाने आंबा कॅनिंगचा भाव ठरवून द्यावा, अशी मागणी बागायतदारांमधून केली जात आहे. या कंपन्या पूर्णपणे येथील बागायतदारांची पिळवणूक करीत आहे. ही पिळवणूक थांबविण्यासाठी शासनाने कृषी विभागाला आंबा कॅनिंगचा भाव ठरविण्याचे अधिकार दिले तर आंबा कॅनिंग कंपन्यांची मक्तेदार संपुष्टात येईल.

याचा फायदा बागायतदारांना होऊ शकतो. या स्टॉलवर २० रुपये प्रति किलोने आंबा खरेदी केला जात आहे. हा भाव यावर्षीचा कमी उत्पन्नाचा विचार केला तर किमान ३५ रुपये प्रति किलोने शेतकऱ्यांना किंवा बागायतदारांना मिळणे आवश्यक होते.

जून महिन्यापासून मे महिन्यापर्यंत अशी वर्षभर आंबा कलमांची मशागत करावी लागते. कलमांना मोहोर आल्यानंतर अनेक किटकनाशक फवारणीची अनेक महागडी औषधे वापरावी लागतात व अशा परिस्थितीमध्ये २० रुपये प्रति किलो बागायतदारांकडून आंबा खरेदी केली जात आहे.

यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी अवस्था बागायतदारांची होण्यास आंबा कॅनिंग कंपन्याच जबाबदार असतात. मात्र कोकणातील आंबा बागायतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणताही राजकीय नेतृत्व नसल्याने बागायतदार एकाकी पडत आहेत. यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांना न्याय मिळण्यासाठी राजकीय नेत्यांनी राजू शेट्टी बनने आवश्यक आहे.गतवर्षीच्या तुलनेने आंबा कॅनिंग व्यवसाय ५0 टक्क्याहून कमीविदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते तेथील पिकांना हमीभाव मिळण्यासाठी उग्र आंदोलने व विधानसभेत आवाज उठवित असताना दिसत आहेत. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी आंबा कॅनिंग व्यवसाय ५0 टक्केहून कमी असणार असल्याचे व्यावसायिकांमधून सांगण्यात येत आहे.यावर्षी आंबा पीक कमी असल्याने याचा परिणाम कॅनिंग व्यवसायावर झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत हजारो टन आंबा कॅनिंगसाठी जात होता. मात्र यावर्षी अल्प प्रमाणात आंबा असल्याने कॅनिंग व्यवसाय कुर्मगतीने सुरू झाला आहे.हा व्यवसाय जेमतेम पंधरा दिवसच चालणार आहे व या कालावधीमध्ये आंबा कॅनिंगला आंबा कमीच असणार आहे असे असताना आंबा कॅनिंगला २0 रुपये माफक दर का? असा प्रश्न बागायतदारांमधून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग