शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

विद्यमान नगरसेवक भाजपच्या वाटेवर : मोंडकर

By admin | Updated: July 16, 2016 23:32 IST

मालवणात गौप्यस्फोट : काँग्रेसमुक्त पालिका करण्याचा भाजपचा नारा

मालवण : मालवण नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसमुक्त पालिका हाच भाजपचा नारा असणार आहे. शहरात सत्ता बदलासाठीच भाजपा प्रयत्नशील असून पालिकेतील अनेक विद्यमान नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. काही नगरसेवकांचा लवकरच प्रवेशही होणार आहे, असा गौप्यस्फोट भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केला आहे. भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहर अध्यक्ष बबलू राऊत, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, शहर सरचिटणीस संदीप शिरोडकर आदी भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मोंडकर म्हणाले, मालवण शहरात असलेल्या १४ हजार मतदारांपैकी २० टक्के मते ही वेगळ्या प्रभागात काही स्थलांतरित अशा स्वरुपात आहेत. या मतांचा वापर करून काही नगरसेवक अनेक वर्षे आपली पोळी भाजत आहेत. मात्र नगरसेवकांचा हा डाव भाजपा यावेळी उधळून लावणार आहे. मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेअंतर्गत नमुना सात या अर्जानुसार संदीप शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाही सुरु आहे. ४१६ ही हरकती नोंद झाल्या आहेत. हरकत नोंदवलेल्या कोणाचेही मतदार यादीतून नाव कमी होणार नाही. ३१ आॅगस्टपर्यंत या हरकती घेतल्या जाणार आहेत. तालुक्यातही मतदार याद्या शुद्धीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून भाजपच्या प्रत्येक जिल्हा परिषद प्रमुखाकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.केंद्र सरकारच्या माध्यमातून उज्वला गॅस कनेक्शन ही नवी योजना दारिद्र्यरेषेखालील जनतेसाठी जाहिर करण्यात आली आहे. मालवण तालुक्यातील ९ हजार ४८२ कुटुंबांची यादी मंजूर करण्यात आली आहे. या कुटुंबाचे गॅस कनेक्शन नसल्यास कुटुंबातील महिला प्रमुखाच्या नावावर गॅस कार्ड मिळणार आहे. यासाठी १६०० रुपये शासन अनुदान तर १६५० रुपये कर्ज स्वरूपात मिळणार आहे. मंजूर झालेली लाभार्थ्यांनी यादी गॅस केंद्र तसेच भाजपा कार्यालयात उपलब्ध आहेत, अशी माहिती मोंडकर यांनी दिली. (प्रतिनिधी)