शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

'वेळागरात होणार्‍या पंचतारांकीत प्रकल्पासाठी घेतलेली शेतकऱ्यांची अधिकची जमीन वगळा'

By अनंत खं.जाधव | Updated: November 23, 2023 17:52 IST

शेतकऱ्यांनी घेतली शरद पवार यांची भेट: अर्चना घारे-परब यांची उपस्थिती 

सावंतवाडी : वेळागर येथे होणार्‍या पंचतारांकीत प्रकल्पाला ज्या शेतकर्‍यांची अधिकची जमिन अधिग्रहीत केली जात आहे. त्यांना वगळण्यात यावे याबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अर्चना घारे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली.दरम्यान या प्रकल्पाला कोणाचा विरोध नाही. परंतू अधिकच्या जमिनी घेतल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचा प्राधान्याने विचार करण्यात यावा, अशी ही मागणी त्यांनी मागणी यावेळी केली आहे. घारे यांनी तेथील शेतकर्‍यांना घेवून नुकतीच शरद पवार यांची मुंबई येथील त्याच्या निवास्थानी भेट घेतली. यावेळी माजी सभापती जयप्रकाश चमणकर, शेतकरी संघटना अध्यक्ष राजू आंदुर्लेकर, सचिव हनुमंत गवंडी, भाऊ आंदुर्लेकर, गजानन गवंडी, शेखर नाईक, संजय आरोसकर, तातू आंदुर्लेकर, प्रकाश गवंडी, महेश आंदुर्लेकर, चंद्रकांत नाईक उपस्थित होते.वेळागर येथे ताजचा पंचतारांकीत प्रकल्प येणार आहे. मात्र  शेतकर्‍यांची अधिकची जमिन अधिग्रहीत केली जात आहे. त्यावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत या अधिकच्या जमिनी वगळण्यात याव्यात अशी मागणी हे शेतकरी करत असून त्यांनी अर्चना घारे-परब याच्या माध्यमातून शरद पवार यांची भेट घेतली असून यावर तोडगा काढण्याची मागणी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSharad Pawarशरद पवार