शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

पक्षधोरणे लोकांपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2015 22:51 IST

राष्ट्रवादीची बैठक : पराभव वरिष्ठांच्या जिव्हारी

सावर्डे : सन २०१९ची विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन येत्या चार वर्षात संघटना बांधणी, मजबूत करुन पक्षाची ध्येयधोरणे, विचार तळागाळात पोहोचविणे आवश्यक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशोक पराडकर यांनी सावर्डे येथे रविवारी आयोजित जिल्हा कार्यकारिणी बैठकीत बोलताना व्यक्त केले.या आढावा बैठकीमध्ये जिल्हा निरीक्षक संदेश कोंडविलकर, रायगड जिल्हा निरीक्षक बाबाजी जाधव, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, कुमार शेट्ये, जिल्हा परिषद गटनेता अजय बिरवटकर, अरविंद आंब्रे, युवक जिल्हाध्यक्ष राजू आंब्रे, सुभाष मोहिते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना पराडकर म्हणाले की, १५ वर्षे सत्तेत असताना पक्षाने अनेक योजना सामान्य जनतेसाठी राबविल्या तरीदेखील विधानसभा निवडणुकीत अपयश आले. हे वरिष्ठ नेते मंडळीच्या जिव्हारी लागले असून, पुन्हा एकदा पक्षाचे विचार व ध्येयधोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी बुथ कमिटीच्या माध्यमातून गाव तेथे झेंडा व पार्टी स्थापन करुन पक्षाला नवी उभारी देऊया, असे आवाहन केले. मुख्य कमिटीच्या माध्यमातून नवीन कार्यकर्ता निर्माण करुन मतदार यादीतील मतदार शोधून त्याला पक्षाचे विचार पटवून देणे गरजेचे आहे. प्रत्येक निवडणुकीवेळी नवमतदार तयार होत असतो. त्याला सत्तेत असताना पक्षाने राबविलेल्या योजना, केलेली विविध विकासकामे पटवून दिली पाहिजेत. हे काम प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ता करु शकतो. त्यामुळे पक्षात धावणारा कार्यकर्ता हवा आहे, असे ते म्हणाले.निरीक्षक कोंडविलकर म्हणाले की, मनातील मरगळ झटकून सर्वांनी एकजुटीने संघटना मजबूत करुया. आमच्या सरकारने योजना अनेक केल्या. परंतु, त्या सामान्यांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. आता आपल्याला सत्तेच्या बाहेर राहून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. सत्तेत असणारे भाजपप्रणित सरकार पाच वर्ष टिकेल की नाही ही शंका आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष निकम यांनी प्रास्ताविक केले.यावेळी बाबाजी जाधव यांची रायगड जिल्ह्याच्या निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच अजित यशवंतराव यांची कोकण युवक संघटक म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. (वार्ताहर)जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत जोमाने कामाला लागण्याचे आदेश.बाबाजी जाधव रायगड जिल्हा निरीक्षकपदी.नवीन कार्यकर्ता निर्माण रण्याची सूचना.जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य.विधानसभेचा पराजय जिव्हारी.