शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
4
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
5
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
6
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
7
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
8
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
9
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
10
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
11
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
12
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
13
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
14
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
15
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
16
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
17
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
18
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
19
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांची परीक्षा!

By admin | Updated: February 20, 2017 23:53 IST

जि.प., पं. स. निवडणूक : ४८५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या १५० जागांसाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी १७०, तर पंचायत समित्यांच्या १०० जागांसाठी ३१५ असे एकूण ४८५ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत. ग्रामीण भागातील ५ लाख ६३ हजार ६३२ मतदार राजा कोणाच्या हाती सत्ता सोपवणार हे गुरुवारी (दि. २३) स्पष्ट होणार आहे. जाहीर प्रचार संपला तरी अखेरच्या क्षणापर्यंत मतपरिवर्तनाचे जोरदार प्रयत्न सर्वच पक्षांकडून सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ५० व ८ पंचायत समित्यांच्या १०० जागांसाठी ंआज, मंगळवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या दरम्यान मतदान होत आहे. ४८५ उमेदवार आपले नशीब आजमावणार असून मतदार कोणाच्या बाजूने मतदान करणार यावर आगामी सत्तेची गणिते अवलंबून राहणार आहेत. ग्रामीण भागातील ५ लाख ६३ हजार ६३२ मतदार मंगळवारी मतदानाचा हक्क बजावणार असून, यात २ लाख ८० हजार ०९२ पुरुष, तर २ लाख ८३ हजार ५४० महिला मतदारांचा समावेश आहे. जाहीर प्रचार करण्याचा कालावधी रविवारी रात्री १२ वाजता संपल्यानंतर आता उमेदवारांचा कल मतदारांच्या गाठी-भेटी घेण्याकडे वाढला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारे प्रचार यंत्रणा राबविल्यानंतर जो काही पेपर उमेदवारांनी मतदारांसमोर सोडविला आहे त्याचे योग्य गुण मतदार आज, मंगळवारी मतांच्या रूपाने उमेदवारांना देणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि. २३) मतमोजणीत कोणत्या पक्षाला मतदारांनी किती गुण दिले व सत्तेच्या परीक्षेत कोण उत्तीर्ण होणार हे ठरणार आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीवर आपलीच सत्ता येणार असा दावा काँग्रेस, शिवसेना व भाजप पक्षाकडून होताना दिसून येत आहे. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते नारायण राणे, आमदार नीतेश राणे, तर शिवसेनेकडून पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत आणि भाजपकडून मंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, काका कुडाळकर आदींकडून प्रचार व विविध सभांमध्ये विरोधकांवर आरोपांच्या फैरीवर फैरी झाडण्यात आल्या होत्या. भाजपच्या प्रचारासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी कुडाळ येथे जाहीर सभा घेत नारायण राणे यांच्यावर आरोप केले होते, तर त्याचठिकाणी ज्येष्ठ नेते राणे यांनी सभा घेत विरोधकांवर हल्ला चढविला होता. त्यामुळे जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. जि. प. उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना मारहाणवरवडे येथील घटना : काँग्रेसच्या ३0 ते ३५ जणांविरुद्ध गुन्हा कणकवली : तालुक्यातील वरवडे-देसाईवाडी येथील पुलाजवळ भाजपच्या कलमठ जिल्हा परिषद उमेदवार प्रज्ञा ढवण यांच्या गाडीतील तीन कार्यकर्त्यांना गाडीतून बाहेर काढून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केली. तसेच या तिघांना ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार संदेश सुनील सावंत (रा. कलमठ-लांजेवाडी) यांनी कणकवली पोलिसांत दिली. ही घटना रविवारी रात्री ११.३0 च्या सुमारास घडली. या तक्रारीनुसार पोलिसांनी काँग्रेसच्या ३0 ते ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल असलेल्यांपैकी ११ जणांना पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. याबाबतचे अधिक वृत्त असे की, संदेश सावंत यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, प्रज्ञा ढवण या भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडण्यासाठी रविवारी रात्री वरवडेला जात होत्या. त्यांच्या चारचाकी गाडीमध्ये संदेश सावंत, मयूर चव्हाण व संजय चिंदरकर होते. प्रज्ञा ढवण वरवडेत आल्याची कुणकुण काँग्रेस कार्यकर्त्यांना लागताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी १५ दुचाकी व ८ चारचाकी गाड्यांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. गाड्या सुसाट वेगाने चालवून ढवण यांची गाडी वरवडे-देसाईवाडी येथील पुलाजवळ अडविली. तसेच गाडीतील संदेश तिघांना गाडीतून बाहेर काढले व त्यांना मारहाण केली तसेच ठार मारण्याची धमकी दिली. तसेच प्रज्ञा ढवण यांच्या गाडीच्या पाठीमागील इंडिकेटर फोडले. हा प्रकार सुमारे पाऊण तास सुरू होता.पोलिसांनी संदेश सावंत यांच्या तक्रारीनुसार काँग्रेसचे कणकवली पंचायत समितीतील उपसभापती महेश गुरव, कार्यकर्ते सोनू सावंत, हनुमंत बोंडरे, संदीप पाटकर, ज्ञानेश अपराज, परेश आचरेकर, विवेक राणे, श्यामसुंदर गणपत आचरेकर, भाऊ चिंदरकर, पांडुरंग नारायण आचरेकर, विनय विठ्ठल हडकर आदी ३0 ते ३५ कार्यकर्त्यांविरोधात मनाई आदेश तोडून मारहाण व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)३0७ अन्वये गुन्हा दाखल करा : प्रमोद जठारप्रज्ञा ढवण यांच्या गाडीवर हल्ला करणे हा पूर्वनियोजित कट होता. हा आचारसंहितेचा भंग आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांवर ३0७, ३२५ अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आपण पोलिसांकडे केली असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली. आम्ही न केलेल्या हल्ल्याची आमदार नीतेश राणे यांनी पोलिसात तक्रार दिली होती. आता तर भाजपच्या एका महिला उमेदवाराच्या गाडीवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यावरून राणे काँग्रेसचा काळ आता संपत आला आहे, असा आरोप प्रमोद जठार यांनी केला आहे.