शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

माजी विद्यार्थ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: October 10, 2015 23:50 IST

बांद्यातील खेमराज महाविद्यालयातील घटना

बांदा : गतिरोधकाच्या मागणीसाठी महामार्गावर खेमराज प्रशाळेची परवानगी न घेता विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याचे उघड झाल्याने माजी विद्यार्थ्यांनी प्रशाळेत धडक देत बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी एम. डी. मोरबाळे यांना शनिवारी घेराव घातला. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी त्यांना तासभर धारेवर धरत राजीनाम्याची मागणी केली. विद्यार्थ्यांना वेठिस धरुन आंदोलन करणे चुकीचे असून राजीनामा न दिल्यास प्रसंगी व्यापक आंदोलन करण्याचा इशारा माजी विद्यार्थ्यांनी दिला. बसस्थानकात येणाऱ्या एसटी बसेस महामार्गावरुन वळविण्यासाठी महामार्गावर गतिरोधक बसविण्यात यावेत, या मागणीसाठी खेमराज प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनात खेमराज प्रशाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचा समावेश नव्हता. यामुळे या आंदोलनात विद्यार्थ्यांना नाहक वेठिस धरण्यात येत असल्याचा आरोप माजी विद्यार्थ्यांनी केला. शनिवारी सकाळी ११ वाजता बांद्यातील सुमारे ५0 ते ६0 माजी विद्यार्थ्यांनी प्रशाळेत धडक देत संस्थेचे प्रशासकीय अधिकारी एम. डी. मोरबाळे यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. विद्यार्थ्यांवर दबाव टाकून त्यांना आंदोलनात उतरवण्यात आल्याचा आरोप विशांत पांगम यांनी केला. यावर मोरबाळे यांनी सांगितले की, विद्यार्थी वेळेत महाविद्यालयात येतील, यासाठी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसारच हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी दळवी, समन्वय समिती सचिव देविदास मोरे, शालेय समिती निमंत्रित सदस्य मकरंद तोरसकर आदी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी या आंदोलनाला परवानगी दिली होती का? अशी विचारणा केली असता, मुख्याध्यापक दळवी यांनी अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले. त्यामुळे शाळेच्या गणवेषात रस्त्यावर उतरणाऱ्या विद्यार्थ्यांवर आपण शाळा प्रशासनाने कोणती कारवाई केली, असा सवाल केल्यानंतर दळवी निरूत्तर झाले. संस्थेचे कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर हे १४ रोजी बांद्यात येत असून त्यावेळी आपण राजीनामा देऊ असे मोरबाळे यांनी सांगितल्याने हा धडक मोर्चा मागे घेण्यात आला. यावेळी यतीन धामापूरकर, तुषार धामापूरकर, मंदार धामापूरकर, केदार कणबर्गी, प्रितम हरमलकर, सनी काणेकर, सर्फराज खान, विकी कदम, साईप्रसाद काणेकर, धिरज भिसे, माजी सरपंच शितल राऊळ, अजिंक्य पावसकर, मिलिंद सावंत, सिद्धेश महाजन, हेमंत दाभोलकर, राकेश केसरकर, नंदू कल्याणकर, मंगलदास साळगावकर, ओंकार नाडकर्णी आदिंसह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी) शिक्षणमंत्र्यांकडे चौकशीची मागणी आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले असते तर त्यांच्या भविष्याची जबाबदारी तुम्ही घेतली असती काय? एखादा विद्यार्थी अपघातग्रस्त झाला तर त्याला जबाबदार कोण, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याची जबाबदारी शाळेची नव्हती का असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावेळी या आंदोलनाची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.