शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:00 IST

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्या अनुषंगाने ईव्हीएम/व्हीव्हीपॅट ची प्रथमस्तरीय तपासणीस आज वैरण बाजार, मिरज येथील शासकीय गोदाम येथे सुरु करण्यात आली. ही तपासणी दिनांक 31 ऑगस्ट 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्देईव्हीएम, व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणारजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली माहिती

सांगली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्या अनुषंगाने ईव्हीएम/व्हीव्हीपॅट ची प्रथमस्तरीय तपासणीस आज वैरण बाजार, मिरज येथील शासकीय गोदाम येथे सुरु करण्यात आली. ही तपासणी दिनांक 31 ऑगस्ट 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक यंत्रणेतील अन्य अधिकारी-कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, मतदार यांच्या उपस्थितीत ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मशीनची प्रथमस्तरीय तपासणी सुरू करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात आदि उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, आगामी विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु असून त्यामध्ये कोणताही विलंब प्रशासनाकडून होणार नाही. पूरपरिस्थितीमुळे अधिकारी/कर्मचारी जरी कामात व्यस्त असले तरीही निवडणुकीचे काम वेळेत पूर्ण होईल. 

 

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी