शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

कृषी विकास कौन्सिल स्थापणार

By admin | Updated: February 25, 2015 00:15 IST

सुधीर सावंत : शेतकरी मेळाव्यात निर्धार

ओरोस : कोकणातील जनतेने कृषी विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावे. शेतकरी बांधवांनी आपली एकजूट करून जमिनींचा शेतीतून विकास करावा. सर्वांच्या समन्वयातून कोकण कृषी विकास कौन्सिलची स्थापना करण्याचा निर्धार आपण करुया, असे आवाहन माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आयोजित सिंधु अ‍ॅग्रो फेस्ट २०१५ च्या शेतकरी मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी प्रतिष्ठान अध्यक्ष ब्रिगेडीयर सुधीर सावंत, आमदार वैभव नाईक, ओरोस सरपंच मंगला ओरोसकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, कृषी अधिकारी नरेंद्र काकडे, जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत, डॉ. व्ही. आर. पवार, डॉ. विलास सावंत, दिनानाथ वेरणेकर, महाराष्ट्र बँकेचे डिंगणकर, राजश्री मानकामे, संतोष सावंत, वैभव पवार, कृषी कॉलेजचे प्राचार्य महेश परुळेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे झालेल्या या मेळाव्यात बोलताना ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी कृषी विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्धार केला आहे.शेती, फळबागा, औद्योगिक वसाहती उभारून शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊया, कृषी विज्ञान केंद्र, शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य देईलच मात्र कृषी विकास कौन्सिलची स्थापना करून प्रत्येक महिन्यात आढावा घेऊन काम केल्यास झपाट्याने आमूलाग्र बदल जिल्ह्यात घडू शकतो, असा विश्वास सुधीर सावंत यांनी व्यक्त केला.आमदार वैभव नाईक म्हणाले, शासनाच्या माध्यमातून जमीन विकासासाठी नवीन योजना आणायाचा प्रयत्न असून जिल्हनयातील शेतकऱ्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस म्हणाले की, कृषी विकास प्रतिष्ठानचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. शरद पवार यांनी कृषी विकासासाठी हे भवन उभारले असून यापुढेही अशा होणाऱ्या कार्यक्रमासाठी हे भवन उपलब्ध करून दिले जाईल. यावेळी ऊसतज्ज्ञ माने पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील ऊस लागवड व विकासाचे रहस्य उलगडून सांगितले व ऊस शेतीकडे वळण्याचे आवाहन केले.दरम्यान, मुक्त विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य महेश परुळेकर, डॉ. विलास सावंत व राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त डॉ. मंदार गीते यांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)६0 जणांचा गौरवयावेळी दुग्ध व्यवसाय, शेती, कुक्कुटपालन, सेंद्रिय शेती, शेळीपालन, भात, नारळ, भाजीपाला, आदी क्षेत्रांतील प्रगतशील शेतकरी व बचतगटांच्या माध्यमातून उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला व पुरुषांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये ६० जणांना गौरविण्यात आले.