शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

एस्. टी. महामंडळाच्या खिशात २ कोटी

By admin | Updated: September 22, 2016 00:46 IST

गणपती बाप्पा पावले : गणेशोत्सव काळातील जादा गाड्यांमुळे उत्पन्नात वाढ

रत्नागिरी : गणेशोत्सवात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे १३५२ जादा गाड्या सोडल्या होत्या. त्याद्वारे एक कोटी ९१ लाख ६० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी सन २०१५मध्ये रत्नागिरी विभागाने १३२६ गाड्या सोडल्या होत्या, त्यावेळी १ कोटी ७१ लाख ३२ हजारांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीच्या तुलनेत गाड्यांच्या संख्येत २६ने वाढ झाली आहे. शिवाय उत्पन्नात २० लाख २८ हजारांनी वाढ झाली आहे. गणेशोत्सवात महामार्गावर खास जादा गाड्यांसमवेत गस्तीपथके तैनात करण्यात आली होती. चिपळूण व कशेडी येथे चेकपोस्ट, संगमेश्वर येथे दुरूस्ती केंद्र तर कशेडी ते संगमेश्वर व संगमेश्वर ते खारेपाटण मार्गावर गस्तीपथक तैनात करण्यात आले होते. याशिवाय महामार्गावर प्रशिक्षण बस तसेच खास पथकाव्दारे ‘स्पेशल पेट्रोलिंग’ करण्यात आले. एस. टी.तील चालक, वाहक, सर्व कर्मचारी, अधिकारीवर्ग यांच्या सहकार्यातूनच तसेच नियोजनाची अंमलबजावणी योग्य पध्दतीने झाल्याने गणेशोत्सवातील एस. टी. प्रवास सुरक्षित झाला असल्याचे विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यावर्षी सर्वाधिक उत्पन्न चिपळूण आगाराला उत्पन्न मिळाले, तर सर्वांत कमी उत्पन्न मंडणगड आगाराला मिळाले. सन २०१३मध्ये रत्नागिरी विभागाने १३१७ गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे १ कोटी ८७ लाख ३८ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. २०१४मध्ये विभागाने १४३० जादा गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे रत्नागिरी विभागाला दोन कोटी १० लाख ६९ हजारांचे उत्पन्न लाभले होते. गेल्या चार वर्षातील उत्पन्नात चढ-उतार सुरू आहे. कोकण रेल्वेव्दारे प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी एस. टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. २०१३, २०१४ या दोन वर्षात ऐन गणेशोत्सवातच रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. गतवर्षी व यावर्षी कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत होती. मुंबई, पुणे, बोरिवली, ठाणे, विठ्ठलवाडी, नालासोपारा, परळ, कल्याण आदी मार्गावर एस. टी.ने जादा गाड्या सोडल्या होत्या. गेल्या वर्षी रत्नागिरी विभागाचे उत्पन्न कमी होते. शिवाय गाड्याही कमी गेल्या. यावर्षी सुरूवातीपासूनच एस. टी.ला मागणी राहिली होती. गणेश चतुर्थीपर्यंत प्रवाशांचे आगमन सुरू होते. गौरी-गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाठी गाड्या सोडल्या होत्या. १५ तारखेपर्यंत परतीचा प्रवास सुरू होता. प्रवाशांचा एस. टी.ला चांगला प्रतिसाद लाभला असल्याचे विभाग नियंत्रक बारटक्के यांनी सांगितले. (प्रतिनिधी) मुंबईहून प्रवाशांना घेऊन १४६८ गाड्या रत्नागिरीत आल्या होत्या, तर परतीसाठी १३५२ जादा गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या. याव्यतिरिक्त दररोज ८६ नियमित फेऱ्यांव्दारे प्रवासी वाहतूक सुरू होती. २४३ गाड्यांचे ग्रुप बुकिंग प्रवाशांकडून करण्यात आले होते. सावट दूर झाले गणेशोत्सवाच्या महिनाभर आधी महाड-पोलादपूर मार्गावरील सावित्री नदीवरील पूल तुटला होता. त्यात दोन एस्. टी. बसेस वाहून गेल्या. त्याचबरोबर यंदा गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस होता. त्यामुळे जादा एस्. टी. बसेसना मिळणारा प्रतिसाद कमी होईल की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात गतवर्षीपेक्षा यंदा एस्. टी. महामंडळाच्या बसेसचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. ४१३५२ एस. टी.च्या गाड्या ४गाड्यांच्या संख्येत २६ने वाढ ४२० लाख २८ हजाराने उत्पन्न वाढले ४गतवर्षी सोडल्या होत्या १३२६ गाड्या.